कोल्हापुरात अवजड वाहनांना प्रवेश बंद
By Admin | Updated: April 29, 2017 02:30 IST2017-04-29T02:30:46+5:302017-04-29T02:30:46+5:30
शहरात वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत शहरात

कोल्हापुरात अवजड वाहनांना प्रवेश बंद
कोल्हापूर : शहरात वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वेळेत अवजड वाहने रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
धुमाळ म्हणाले, वाहने वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यावर उपाय म्हणून ही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)