शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वृक्षतोड थांबवा, अन्यथा चिपको आंदोलन; वर्धेकरांचा एल्गार, पालकमंत्र्यांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 22:32 IST

या संदर्भात सेवाग्राम येथे आयोजित कार्यकर्ता सभेत, प्रशासनाने वृक्षतोड न थांबविल्यास 'चिपको आंदोलन' सुरू करण्याचा इशारा सामाजिक संघटनांद्वारे देण्यात आला आहे.

वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून या परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. यात ७० वृक्ष आधीच जमीनदोस्त झाले असून १७० वृक्ष तोडण्याची तयारी सुरू आहे. याला विरोध दर्शवत वर्ध्यातील विविध सामाजिक संघटनांनी पालकमंत्री सुनील केदार यांना वृक्षतोड थांबविण्याबाबत संयुक्त निवेदन दिले. चौपदरी रस्ता रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली होणा-या या वृक्षतोडीत महात्मा गांधी, कस्तुरबा आणि त्या काळातील अनेकांनी लावलेली ७०-८० वर्षे जुनी झाडे तसेच सामाजिक संघटनांनी गत दोन दशकात लावलेल्या झाडांचीही कटाई करणे सुरू आहे.

ही वृक्षतोड न करता वृक्ष सुरक्षित ठेऊन विकासकामे करावीत अशी मागणी डाॅ. उल्हास जाजू, करुणा फुटाणे, संजय इंगळे तिगावकर, सुषमा शर्मा, ओजस सु.वि., डाॅ. विठ्ठल साळवे, मुरलीधर बेलखोडे, डाॅ. विभा गुप्ता, डाॅ. सचिन पावडे, अशोक बंग, सुधीर पांगूळ, प्रा. किरण जाजू, प्रदीप दासगुप्ता, डाॅ. लोकेश तमगिरे, डाॅ. सोनू मोर, डाॅ. प्रणाली कोठेकर, डाॅ. सुमेध जाजू, मालती देशमुख, अद्वैत देशपांडे, सूचि सिन्हा, प्रभाकर पुसदकर, डाॅ आलोक बंग, डाॅ. अनुपमा गुप्ता, दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, सचिन घोडे, दर्शन दुधाने, अतुल शर्मा, अनिल फरसोले, निरंजना मारू, अॅड. पूजा जाधव, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, मुकेश लुतडे, जीवन अवथरे, किशोर अमृतकर, शरद ताकसांडे, भाग्यश्री उगले, वर्षा खर्डे, भाऊ चन्नोळे, शंकर भोयर, अक्षद सोमनाथे, तीर्थेश लुतडे, मयूर नागोसे, यश, आशीष चव्हाण, सुमीत उगेमुगे, मोहीत सहारे, प्राजक्ता मुते, गुरुराज राऊत, चेतन परळीकर, रोहिणी बाबर, सुनील ढाले, विनोद साळवे, रुपाली भेदरकर, राजश्री चौधरी, नैना गोबाडे, भूमिका गुडधे, प्रगती आंबूलकर, प्रिया कोंबे, विकेश तिमांडे, वैभव फुलकरी, कार्तिक इंगळे, लक्ष्मी नाईक, जयश्री कामडे, वैभव वासेकर, अफरोज शेख, श्वेता नारायणे यांच्यासह सुमारे दोनशे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात सेवाग्राम येथे आयोजित कार्यकर्ता सभेत, प्रशासनाने वृक्षतोड न थांबविल्यास 'चिपको आंदोलन' सुरू करण्याचा इशारा सामाजिक संघटनांद्वारे देण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलन