दादर-सावंतवाडी ट्रेनला दिव्यात थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 11:43 IST2016-09-04T09:32:49+5:302016-09-04T11:43:06+5:30

दादर-सावंतवाडी गणपती विशेष गाडीला दिवा रेल्वे स्थानकात थांबा मिळाला आहे. या निर्णयामुळे कोकणात जाणा-या हजारो गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.

Stop the Dadar-Sawantwadi train in the lamp | दादर-सावंतवाडी ट्रेनला दिव्यात थांबा

दादर-सावंतवाडी ट्रेनला दिव्यात थांबा

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - दादर-सावंतवाडी गणपती विशेष गाडीला दिवा रेल्वे स्थानकात थांबा मिळाला आहे. या निर्णयामुळे कोकणात जाणा-या हजारो गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाला प्रवाशांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 
 
दिव्यात थांबा हवाच अशी प्रवाशांची मागणी होती. हा निर्णय म्हणजे लोकमतच्या रेल परिषदेचं फलित असल्याचं दिवा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ऍड.आदेश भगत यांनी सांगितलं. कोकणात गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी मोठया संख्येने जातात. 
 
कोकणात जाणा-या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वेने नियमित गाडयांपेक्षा अनेक गणपती विशेष अतिरिक्त ट्रेन सोडल्या आहेत. या सर्व ट्रेन प्रवाशांनी खच्चून भरुन कोकणात जात आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या गाडयांचे आरक्षण दोन महिने आधीच फुल्ल होते. 

Web Title: Stop the Dadar-Sawantwadi train in the lamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.