हिंमत असेल थांबवून दाखवा, मुजाहिदीनची मारियांना धमकी
By Admin | Updated: July 27, 2014 14:44 IST2014-07-27T14:44:02+5:302014-07-27T14:44:59+5:30
मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना पत्राद्वारे मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली असून या पत्रावर इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा उल्लेख आहे.

हिंमत असेल थांबवून दाखवा, मुजाहिदीनची मारियांना धमकी
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २७ - मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना पत्राद्वारे मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली असून या पत्रावर इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा उल्लेख आहे. या धमकीपत्राची पोलिस कसून चौकशी करत असून मुंबईत सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मुंबईचे आयुक्त राकेश मारिया यांना दोन दिवसांपूर्वी धमकी देणारे एक पानी पत्र मिळाले आहे. हिंदी व इंग्रजी भाषेतून हे पत्र लिहीण्यात आले आहे. '१९९३ मध्ये तुम्ही नशीबनान ठरले होता. मात्र आता हिंमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा' अशी धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे. पत्राखाली इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे नाव असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे पत्र कुठून आले, पत्र दहशतावी संघटनेने पाठवले की खोडसाळपणाने पत्र पाठवण्यात आले याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. तसेच या पत्रानंतर दहशतवादविरोधी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मुंबईतील बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.