डोक्यात दगड घालून मजुराची निर्घृण हत्या
By Admin | Updated: July 12, 2017 13:11 IST2017-07-12T13:11:09+5:302017-07-12T13:11:09+5:30
वाकडमधील थेरगावातील काळेवाडी-पिंपरी रस्त्यावर धनगरबाबा मंदिरासमोरील एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याचे वृत्त समोर आले.

डोक्यात दगड घालून मजुराची निर्घृण हत्या
>ऑनलाइन लोकमत
वाकड (पिंपरी-चिंचवड), दि. 12 - वाकडमधील थेरगावातील काळेवाडी-पिंपरी रस्त्यावर धनगरबाबा मंदिरासमोरील एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केल्याचे वृत्त समोर आले. बुधवारी ( १२ जुलै) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बाचाबाची आणि भांडणाच्या रागातून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वाकड पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अण्णा पेंटर (वय 37 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्येमागील कारणं शोधण्याचे काम सध्या वाकड पोलीस करत आहेत. पेंटर यांच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी व्यक्त केला असून पुढील तपास करीत आहेत.