वडिलोपार्जित घरासाठी आईच्या डोक्यात घातला दगड
By Admin | Updated: April 20, 2017 21:25 IST2017-04-20T21:25:15+5:302017-04-20T21:25:15+5:30
वडिलोपार्जित घर नावावर करून दिले नाही म्हणून मुलाने आईच्या डोक्यात दगड घातल्याचा प्रकार साता-यात घडला.

वडिलोपार्जित घरासाठी आईच्या डोक्यात घातला दगड
>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 20 - वडिलोपार्जित घर नावावर करून दिले नाही म्हणून मुलाने आईच्या डोक्यात दगड घातल्याचा प्रकार साता-यात घडला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, संबंधित जखमी मातेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
छाया प्रल्हाद यादव (वय ५५, रा. दिव्यनगरी, सातारा) असे अभागी मातेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास रविराजचा आई छाया यांच्यासोबत वडिलोपार्जित घर नावावर करून देण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रविराजने आईच्या डोक्यात दगड घातला. त्यामध्ये त्याची आई गंभीर जखमी झाली. काही नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना तत्काळ दाखल केले. या घटनेननंतर पोलिसांनी छाया यादव यांचा जबाब घेऊन रविराजवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप त्याला पोलिसांनी अटक केली नाही.