पोटच्या गोळ्याला १८ हजार रुपयांना विकले

By Admin | Updated: November 8, 2016 05:18 IST2016-11-08T05:18:02+5:302016-11-08T05:18:02+5:30

आपल्या चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाकडून झालेल्या अवघ्या सात दिवसांच्या पोटच्या गोळ््याला १८ हजार रुपयांत विकणाऱ्या महिलेला आणि हे बाळ खरेदी करणाऱ्या

The stomach pills sold for 18 thousand rupees | पोटच्या गोळ्याला १८ हजार रुपयांना विकले

पोटच्या गोळ्याला १८ हजार रुपयांना विकले

मनीषा म्हात्रे, मुंबई
आपल्या चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाकडून झालेल्या अवघ्या सात दिवसांच्या पोटच्या गोळ््याला १८ हजार रुपयांत विकणाऱ्या महिलेला आणि हे बाळ खरेदी करणाऱ्या अन्य एका महिलेला नागपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीवरील बलात्कारप्रकरणी या नराधम सावत्र पित्याला गजाआड केल्यानंतर या महिलेने हे कृत्य केले.
नागपाड्यातील कामाठीपुरा परिसरात ही ३० वर्षीय महिला एक मुलगा आणि चार वर्षाच्या मुलीसोबत राहते. पहिला पती सोडून गेल्यानंतर ती याच परिसरातील अन्य एका व्यक्तीसोबत राहू लागली. लग्नाच्या काही दिवसांतच त्याची नजर या महिलेच्या लहान मुलीवर पडली. घरात कोणी नाही हे पाहून त्याने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी या महिलेने नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या नराधमास पॉस्को आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत बेड्या ठोकल्या. तो सध्या कारागृहात आहे. त्यानंतर पोलिसांनी या मुलीला सामाजिक संस्थेच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान, याच नराधमाकडून गर्भवती राहिलेल्या या महिलेला पुन्हा मुलगीच झाली. व्हीपी रोड परिसरात राहणारी मैत्रीण बेबी अमित पारुलला अपत्य नाही ही बाब या महिलेला माहिती होती. म्हणून तिने मुलगी विकण्याबाबत तिच्याकडे बोलणी केली. पारुलनेही मुलीला विकत घेण्याचे आश्वासन दिले. साडे अठरा हजार रुपयांत सौदा ठरला. या महिलेने पैसे घेऊन मुलीला तिच्या ताब्यात दिले.
ही बाब सामाजिक संस्थेच्या मार्फत नागपाडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक संजय बसवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या पथकाने या दोघींच्या मुसक्या आवळल्या.
त्यांच्या चौकशीत ही काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. दोघींनाही न्यायालयीन कोठडी ठोठावली असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली.

हतबलतेतून उचलले पाऊल?
या महिलेच्या पतीने तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या अवघ्या चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. या महिलेच्या तक्रारीनंतर त्याला अटक केली असून तो सध्या कोठडीत आहे.
या नराधमापासून या महिलेला ही दुसरी मुलगी झाली होती. मात्र, तिचे पालनपोषण कसे करायचे, तिच्यावरही अशाच नराधमाची नजर तर पडणार नाही ना, या चिंतेतून तिने अवघ्या सात दिवसांच्या बाळाला विकण्याचे ठरवले.

Web Title: The stomach pills sold for 18 thousand rupees