पोटासाठी शरीराला फटके !
By Admin | Updated: October 4, 2016 14:49 IST2016-10-04T14:48:38+5:302016-10-04T14:49:44+5:30
नार्टक राज्यातील बेल्लुर येथील रमेश हा व्यक्ती पोटासाठी पोतराजचे सोंग घेवून शरिराला फटके मारून स्वता: ला जखमी करून घेत आहे.

पोटासाठी शरीराला फटके !
>राहुल वाडेकर विक्रमगड
विक्रमगड : पोटासाठी प्रत्येक व्यक्ती परिश्रम करीत असतो. काही व्यक्ती वेळ देतात, काही व्यक्ती श्रम करतात तर काही व्यक्ती बुध्दीचा उपयोग करतात. यासाठी त्या व्यक्तीला गरज प्रमाणे पैसे मिळतात. त्या पैशाचा उपयोग जीवन चरितार्थसाठी म्हणजेच पोटासाठी खर्च करीत असतो. मात्र कनार्टक राज्यातील बेल्लुर येथील रमेश हा व्यक्ती पोटासाठी पोतराजचे सोंग घेवून शरिराला फटके मारून स्वता: ला जखमी करून घेत आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त कनार्टक राज्यातून पारंपारिक पोतराजचे सोंग घेणारे कुटुुंबिय महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांसह पोतराजचे सोंग घेवून वाद्यावर नृत्य करून स्वता:च्या शरिराला चाबूकाने फटके मारून ते जखमी करून घेत आहेत. ही एक कला असली तरी चाबूकाचे फटके स्वता:च्या शरिराला मारणे म्हणजे कष्ठप्रद व आपल्या खारख्या अनेकांना विचार कराला लावणारा प्रसंग असतो. पालघर व ठाणे सह विक्रमगडमध्ये पोतराजचे सोंग घेवून पत्नी व लहान बाळासह बालासाहेब हा प्रत्येक दुकानदारासमोर येवून नृत्य करून स्वता:च्या शरिराला चाबूकाने फटके मारून घेत आहे. यावेळी त्याची पत्नी वाद्य वाजवित असते. त्याचे नृत्यू बघून अनेक दुकानदार त्यास दहा, विस रूपयाची मदत करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञान किंवा शिक्षणाचा अभाव असलेले बालासाहेबाचे कुटुंब आजही पारंपारिक पोतराजचे सोंग घेवून भिक्षा मागताना दिसून येत आहे. याबाबत त्याला विचारले असता, आमचा पारंपारिक हाच व्यवसाय असून पोटासाठी शरिराला फटके मारून घेत असल्याचे त्याने सांगितले.उत्सवकालात देवीभक्त देवीच्या नावाने चांगली मदत करीत असल्याचेही त्याने लोकमतशी बोलताना सांगितले.