औरंगाबादमध्ये मारोती मंदिरात चोरी

By Admin | Updated: March 13, 2016 13:58 IST2016-03-13T13:58:41+5:302016-03-13T13:58:41+5:30

शहरातील मयुर पार्क भागातील मारोती नगर परिसरातील मारोती मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला.

Stolen at Maroti temple in Aurangabad | औरंगाबादमध्ये मारोती मंदिरात चोरी

औरंगाबादमध्ये मारोती मंदिरात चोरी

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
औरंगाबाद, दि. १३ -  शहरातील मयुर पार्क भागातील मारोती नगर परिसरातील मारोती मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला. हनुमानाच्या मुर्तीवरील चांदीचा टोप आणि हातातील चांदीचे कडे, असा एकूण 40 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 
रविवारी सकाळी दर्शनाला गेलेल्या भाविकाच्या लक्षात हा प्रकार आल्यावर मनसुख रामराव वाघ यांच्या फिर्यादीवरुन हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार दिवाकर पाटील करीत आहेत.

Web Title: Stolen at Maroti temple in Aurangabad