भाजपाशी अजुनही जुळू शकतं - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: November 10, 2014 19:08 IST2014-11-10T19:08:55+5:302014-11-10T19:08:55+5:30
काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असल्याने आमची स्थिती ना घरका ना घाटका अशी होऊ नये म्हणून आम्ही विरोध पक्षनेतेपदावर दावा केल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भाजपाशी अजुनही जुळू शकतं - उद्धव ठाकरे
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असल्याने आमची स्थिती ना घरका ना घाटका अशी होऊ नये म्हणून आम्ही विरोध पक्षनेतेपदावर दावा केल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. भाजपाशी चर्चेचं गु-हाळ सुरू होतं, नुसता गोंधळ होता असं सांगताना अजुनही चर्चा होऊ शकते त्यातून जुळलं तर जुळलं असं सांगत ठाकरे यांनी अजूनही भाजपाशी युती होऊ शकते असे संकेत दिले आहेत. अर्थात, आम्ही लाचारी पत्करणार नाही, सन्मानजनक तोडगा निघायला हवा असे सांगत भाजपाने पुढाकार घ्यायला हवा असे ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी अटलबिहारी वाजपेयींना सत्तास्थापनेसाठी मदत केली होती आणि मंत्रिपदे न मागता, आधी तुम्ही सत्ता मिळवा असं सांगितल्याची आठवण ठाकरे यांनी करून दिली. शरद पवारांवर जोरदार टीका करताना शरद पवारांसारख्यांचा पाठिंबा यांना कसा चालतो असा प्रश्नही उद्धव यांनी उपस्थित केला आहे. वाजपेयी सरकार स्थापन झालं त्यावेळी शरद पवार विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी पवारांनी वाजपेयींचं सरकार एका मतांनी पाडलं होतं याचीही आठवण ठाकरे यांनी भाजपाला करून दिली असून, अशा पवारांचा पाठिंबा भाजपा घेत आहे, हे लक्षात घ्या असा चिमटा ठाकरे यांनी घेतला.