मराठीसाठी पश्चिम रेल्वेचे पाऊल

By Admin | Updated: April 23, 2017 14:56 IST2017-04-23T14:56:25+5:302017-04-23T14:56:25+5:30

मुंबई व पश्चिम उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या मराठी नावांची माहिती पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयां कडुन मागीतली आहे

Steps for Western Railway for Marathi | मराठीसाठी पश्चिम रेल्वेचे पाऊल

मराठीसाठी पश्चिम रेल्वेचे पाऊल

ऑनलाइन लोकमत
मीरारोड, दि. 23 - मुंबई व पश्चिम उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या मराठी नावांची माहिती पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयां कडुन मागीतली आहे. काही रेल्वे स्थानकांचा अमराठी भाषेतुन अपभ्रंष व चुकीचा उल्लेख होत असल्याच्या तक्रारी व आंदोलने होत असल्याने रेल्वे प्रशासनाने देखील सकारात्माक पाऊल उचलले आहे.

भार्इंदर स्थानकाचा हिंदी व इंग्रजीतुन भायंदर असा सर्रास अपभ्रंश केला जात आहे. शिवाय मराठीतुन सुध्दा भायंदर असे लिहले जात होते. मध्यंतरी तर गुजराती भाषेतली भार्इंदर अशी पाटी लावण्यात आली. महसुली नोंदी भार्इंदर असे नांव असताना त्याचा हिंदी वा इंग्रजीतुनपण भार्इंदर असाच उल्लेख व्हायला पाहिजे अशी गेल्या अनेक वर्षां पासुन शिवसेना, मनसे आदिंची मागणी होत होती. महासभेत सुध्दा ठराव करण्यात आला. परंतु या राजकिय पक्षांनी नंतर याचा पाठपुरावा केला नाही.

दरम्यान मराठी एकीकरण समितीने भार्इंदर सह वांद्रे, परळ अशी मराठमोळी गावांची नांवे असताना त्याचा हिंदी, इंग्रजी तुन चालणारा अपभ्रंश रोखण्यची मागणी मुख्यमंत्र्यांसह रेल्वे प्रशासना कडे चालवली होती. त्याच सोबत आरक्षण अर्ज, इत्तर अर्ज मराठी भाषेत उपलब्ध करावेत, तिकीटे व पास मराठी भाषेतुन द्यावेत, सर्व उद्घोषणा, सर्व माहिती फलक व जनजागृती फलक/पत्रकां मध्ये राज्याची राजभाषा म्हणुन मराठीला प्राधान्य देण्याची मागणी चालवली आहे. रेल्वे वर्कस् मॅन्युअल मध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याचा आग्रह समितीने धरला आहे. त्यासाठी समितीने उपोषण, धरणे आंदोलन, स्वाक्षरी मोहिम तसेच निषेध आंदोलने चालवली .

अखेर पश्चिम रेल्वेने सुध्दा सदर बाब गांभीर्याने घेत रेल्वे स्थानकांच्या नावां मध्ये असणारा मराठीचा अपभ्रंश थांबवण्यासाठी सकारात्मक पाऊाल उचलले आहे. पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी तर मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी यांना ६ एप्रिल रोजी पत्र पाठवुन त्यांच्या हद्दीत येणारया रेल्वे स्थानकांची मूळ महसुली नोंदी असलेली मराठीतली नांवे व त्याचे शब्दलेखन मागवले आहे.

रेल्वे स्थानकांच्या नावांचा चुकीचा उल्लेख होत असल्या बद्दल प्रवाशी व ंसंस्थां कडुन सातत्याने तक्रारी येत आहेत. रेल्वे स्थानकांच्या नावांची मंजुरी राज्य शासना कडुन होत असते. त्यामुळे महसुली नोंदी अलेली नांवे व शब्दलेखन अधिकृत रीत्या उपलबध्द करुन द्यावे जेणे करुन नावात सुधारणा करायची गरज असल्यास ती करता येणार आहे असे रेल्वेने म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेने मराठी नावांचा होणारा अपभ्रंश वा चुकीचा नामोल्लेख बदलण्याच्या हालचाली सुरु केल्याने मराठी एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे. मराठी ही राजभाषा अल्याने तीचा सन्मान व संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असुन मराठीसाठी लढा सुरुच राहिल असे ते म्हणाले.

 

Web Title: Steps for Western Railway for Marathi