शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हाडदा, दापोरा व धानोराचे धवल क्रांतीच्या दिशेने पाऊल

By admin | Updated: April 16, 2017 16:03 IST

जळगाव तालुक्यातील धानोरा, कुऱ्हाडदा व दापोरा येथील दूध उत्पादकांना वर्षभरासाठी आगाऊ रक्कम देऊन त्यांच्या दूधाला

चंद्रकांत जाधव/ ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 16 - जळगाव  तालुक्यातील धानोरा, कुऱ्हाडदा व दापोरा येथील दूध उत्पादकांना वर्षभरासाठी आगाऊ रक्कम देऊन त्यांच्या दूधाला प्रचलित दर न देता आर्थिक शोषण करणाऱ्या दूध संकलन करणाऱ्या मध्यस्थांच्या जोखडातून दूध उत्पादकांना बाहेर काढण्यात आले आहे. या उत्पादकांच्या दूधाला प्रचलित दर मिळवून देण्याचा प्रयत्न गांधी रिसर्च फाउंडेशन (जीआरएफ) व नाबार्ड (नॅशनल बँक आॅफ अ‍ॅग्रीकल्चरल अ‍ॅण्ड रूरल डेव्हलपमेंट) यांनी केला. या प्रयत्नामुळे दूध उत्पादकांना आपल्या कष्टाचे मोल मिळू लागले आहे. अर्थातच ही धवल क्रांती या तीनही गावांच्या दृष्टीने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणारी ठरत आहे. या गावांमध्ये मागील तीन वर्षांपासून गांधी रिसर्च फाउंडेशनचे ग्रामविकास कार्यवाह काम करीत आहे. या अंतर्गत धानोरा येथे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. धानोरा येथे राजेंद्र जाधव, दापोरा येथे सागर चौधरी व कुऱ्हाडदा येथे राहुल लांबेळे हे कार्यरत आहे. ग्रामीण विकासासंबंधीच्या गरजा, उपक्रम याची त्यांना माहिती व्हावी, ग्रामीण नेतृत्व विकास याचे प्रशिक्षण यासंबंधी हे कार्यवाह गांधी रिसर्च फाउंडेशनने पाठविले होते. अशातच या गावांमधील दूध उत्पादकांना वर्षभरासाठी मोठी आगाऊ रक्कम काही दूध संकलन करणारे मध्यस्थ द्यायचे व नंतर ३० व ३२ रुपये दरात त्यांचे दूध खरेदी करायचे. दूध हप्त्यापोटी जी रक्कम मध्यस्थ दर १० दिवसात या दूध उत्पादकांना द्यायचे त्यातूनच आगाऊ रकमेतील काही रक्कम कपात करायचे... दुसऱ्या बाजूला या दूध उत्पादकांकडून दूध कमी दरात घेऊन त्याची शहरात ४० ते ५० रुपये लीटरने सरसकट विक्री करायचे... हा सर्व प्रकार गांधी रिसर्च फाउंडेशनच्या लक्षात आले.

शेतकरी उत्पादक संघाची स्थापनायासंदर्भात दूध उत्पादकांना संघटीत करून दूधाचे विपणन, त्याचे दर, ग्राहकांशी थेट जुळण्याचे लाभ अशा बाबींची माहिती देण्यात आली. या गावांमध्ये शेतकरी उत्पादक संघाची स्थापना केली. दापोरा येथे २५, धानोरा येथे १५ व कुऱ्हाडदा येथ ३० उत्पादक सहभागी झाले. धानोरा व कुऱ्हाडदा येथे २ आॅक्टोबर २०१६ म्हणजेच अहिंसा दिन, महात्मा गांधी जयंतीला तर दापोरा येथे १ जानेवारी २०१७ ला हा संघ स्थापन झाला. दूध उत्पादकांना दूधाची प्रक्रिया, विपणन यासंबंधीची माहिती गुजरात दौऱ्याच्या माध्यमातून देण्यात आली.

४० व ५० रुपये दर मिळू लागलाधानोरा येथील दूध उत्पादकांचे सकाळचे दूध जैन इरिगेशनच्या राजाभोज केंद्रात दिले जाते. सायंकाळचे दूध संबंधित उत्पादक स्वत: जळगावात येऊन थेट ग्राहकांना देतात. दापोरा व कुऱ्हाडदाचे उत्पादक दूध संघाला दूध पुरवठा करतात. संघातर्फे जे दर आहेत ते या उत्पादकांना मिळतात. पण धानोरा येथील उत्पादकांना गायीच्या दूधाला ४० व म्हशीच्या दूधाला ५० रुपये दर मिळतो. दापोरा येथे ३५० लीटर, कुऱ्हाडदा येथे ५५० लीटर रोजचे दूध संकलन होते. पूर्वी दापोरा येथे फक्त संबंधित दूध उत्पादक ८० लीटर दूध उत्पादन करू शकत होते. आता या गावात दूध उत्पादनात वाढ झाली आहे.

अर्थसाहाय्य करून उभारीसंबंधित दूध उत्पादकांना संकलन केंद्र, तपासणी यंत्रणा, मोजणीचे साहित्य आदींसाठी निधीची गरज होती. त्यासाठी नाबार्डतर्फे धानोरा येथील उत्पादकांना सव्वादोन लाख, दापोरा येथे ९० हजार व कुऱ्हाडदा येथे ६० हजार रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले. कमी व्याजदरात हे कर्ज दिले. त्यातील कुऱ्हाडदाच्या गटाने ६० हजारांची परतफेडही केली आहे. प्रक्रिया व विपणनसाठी प्रकल्पया गावांमध्ये दूध प्रक्रिया व त्याचे विपणन यासाठी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. उत्पादक स्वत:च्या ताकदीवर उभे राहीले तर विकासाला चालना मिळते. शेतमालाच चांगला दर मिळतो, असे या शेतकऱ्यांना लक्षात आले व ते विकासाच्या मार्गावर चालू लागल्याचे गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक जॉन म्हणाले. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे गट स्थापन करून त्यांना विपणन, प्रक्रिया याबाबतची माहिती देण्यात आली. दापोरा, कुऱ्हाडदा, धानोरा येथे या उपक्रमाच्या माध्यमातून दूध उत्पादकांना लाभ झाला. गांधी रिसर्च फाउंडेशन व नाबार्ड यांच्या साहाय्याने हे शक्य झाले. -जी.एम.सोमवंशी, सहायक महाव्यवस्थापक, नाबार्ड