धनदांडग्या शेतकऱ्यांसाठी सुकाणू समितीचा आटापिटा- पांडुरंग फुंडकर
By Admin | Updated: June 27, 2017 22:17 IST2017-06-27T22:17:38+5:302017-06-27T22:17:38+5:30
सुकाणू समितीने आता धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा म्हणून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला

धनदांडग्या शेतकऱ्यांसाठी सुकाणू समितीचा आटापिटा- पांडुरंग फुंडकर
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 27 - गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समितीने आता धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा म्हणून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचा आरोप आरोप कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी येथे विश्राम गृहात पत्रकारांशी बोलताना केला.
कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे पहिल्यांदाच बुलडाणा शहरात आगमन झाले. त्यानिमित्त भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषदच्यावतीने ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्राम भवनात पत्रकारांशी वार्तालाप करताना फुंडकर म्हणाले, की राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील शेतकऱ्यांची ३० हजार कोटी
रूपयांची कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफीमुळे शेतकरी आनंदीत झाला असून येणाऱ्या खरीप हंगामात मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयाचे अनेक फायदे होणार आहे. त्यापैकी राज्यातील जवळपास ४० लक्ष शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार आहे.
सुकाणू समितीने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे विचारल्यावर ते म्हणाले, की शासनाच्या कर्जमाफीचा फायदा
राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र त्यानंतरही सुकाणू समितीने आंदोलनाचा इशारा आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा व्हावा म्हणून पुन्हा आंदोलनाची भाषा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जि.प. सभापती श्वेता
महाले यांची उपस्थिती होती.