प्रचाराला गेलेल्या कार्यकर्त्याचा बैल चोरला
By Admin | Updated: October 10, 2014 01:38 IST2014-10-10T01:38:00+5:302014-10-10T01:38:00+5:30
निवडणुकीत कोणाला फायदा तर कोणाला तोटा होणारच. मात्र, या निवडणुकीत एका कार्यकर्त्याला चक्क आपला बैल गमवावा लागला आहे

प्रचाराला गेलेल्या कार्यकर्त्याचा बैल चोरला
वरपगाव : निवडणुकीत कोणाला फायदा तर कोणाला तोटा होणारच. मात्र, या निवडणुकीत एका कार्यकर्त्याला चक्क आपला बैल गमवावा लागला आहे. कल्याण तालुक्यातील ठाकूरवाडा गावातील गणपत हिंदोळे हा कार्यकर्ता गोवेली येथे एका पक्षाच्या कार्यकर्त्यांचा बोलवण्यावरून गेला असता त्याच्या दोन बैलांपैकी सनी नावाचा बैल चोरीस गेला.
मंगळवारी दिवसभर गणपते, रेवती, पिंपळोली, चौरे, केळणी आदी गावांत बैलाचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दिवाळीच्या आसपास भातकापणीस सुरुवात होईल. भाताचे भारे वाहण्यासाठी बैलगाडी व बैलाची गरज असते. मात्र, आता गणपत हिंदोळे यांंंंंचा बैल चोरीला गेल्याने शेतीची कामे कशी करायची, असा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. (वार्ताहर)