आधारकार्ड स्कॅनर अ‍ॅपमुळे एसटीची फसवणूक टळणार

By Admin | Updated: March 5, 2017 19:57 IST2017-03-05T19:16:04+5:302017-03-05T19:57:21+5:30

स्मार्टफोनसाठी विकसीत करण्यात आलेले आधार कार्ड स्कॅनर अ‍ॅप एसटीच्या वाहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

STC fraud will be eliminated due to Aadhaar card scanner app | आधारकार्ड स्कॅनर अ‍ॅपमुळे एसटीची फसवणूक टळणार

आधारकार्ड स्कॅनर अ‍ॅपमुळे एसटीची फसवणूक टळणार

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 5 - स्मार्टफोनसाठी विकसीत करण्यात आलेले आधार कार्ड स्कॅनर अ‍ॅप एसटीच्या वाहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या अ‍ॅपमुळे बनावट आधारकार्ड ओळखले जाणार असून, खोटी जन्मतारिख टाकून तिकिटात सवलत घेण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकारांना आळा घालता येणार आहे.

आधार  कार्डवरील बारकोड स्मार्ट फोनच्या कॅमेºयासमोर लावला की तो स्कॅन होऊन सदर कार्डधारकाची संपूर्ण माहिती मोबाईलवर दिसते. त्यामुळे एखादवेळी संगणकाचा आधार घेऊन आधारकार्डच्या रंगीत झेरॉक्सवर जनमतारिख बदलण्याचा प्रकार कोणी केला, तर तो त्यामध्ये ओळखला जातो. मंगरुळपीर आगारातील दोन तीन वाहक हे प्रयोग करीत आहेत. 

Web Title: STC fraud will be eliminated due to Aadhaar card scanner app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.