संगोपनासाठी सजग रहा

By Admin | Updated: July 2, 2016 03:35 IST2016-07-02T03:35:04+5:302016-07-02T03:35:04+5:30

शासनाच्या एकच लक्ष दोन कोटी वृक्ष हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आजच्या वृक्षलागवडीसाठी शासन यंत्रणेप्रमाणेच सर्व घटक सरसावले आहेत

Stay alert for the ropes | संगोपनासाठी सजग रहा

संगोपनासाठी सजग रहा


वाडा : शासनाच्या एकच लक्ष दोन कोटी वृक्ष हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आजच्या वृक्षलागवडीसाठी शासन यंत्रणेप्रमाणेच सर्व घटक सरसावले आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, यापुढे याच उत्साहात व जबाबदारीने वृक्षसंगोपनासाठी सजग व जागृत राहिले पाहिजे असे आवाहन आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी वाडा येथे केले.
ते वाडा येथील पां. जा. हाय
स्कूल येथे आयोजित केलेल्या वृक्षलागवड कार्यक्र मात बोलत होते. वाडा तालुका भाजपाच्या वतीने वाड्यातील पां.जा. हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय, वाडा मॅनेजमेंट कॉलेज, सिद्धेश्वर मार्ग येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणांद्वारे मोहिमेचे महत्व सांगितले.
यावेळी भाजप प्रदेश सदस्य बाबाजी काठोले, वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, वाडा शहर अध्यक्ष स्वप्नील रोठे , युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष पवार, यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील गुंज काटी येथील जंगलात ३ हजार २०० वृक्षांची लागवड दासभक्तांनी केली. वाडा पोलीस ठाण्यातर्फे परळी येथील पोलीस चौकीच्या प्रांगणात झाडे लावण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक, सहायक पोलीस निरीक्षक संजय चौधरी उपस्थित होते. वाडा तहसील, पंचायत समिती व विविध कार्यालय तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीत शाळात वृक्षारोपण करण्यात आले.
>दासभक्तांनी केली लागवड

Web Title: Stay alert for the ropes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.