शिवसेनाप्रमुखांचा पुतळा कल्याणकडे रवाना
By Admin | Updated: January 1, 2017 15:35 IST2017-01-01T14:21:43+5:302017-01-01T15:35:41+5:30
ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 1 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे बसवण्यात येणारा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा पुर्णाकृती पुतळा कोल्हापूरहून कल्याणकडे रवाना ...

शिवसेनाप्रमुखांचा पुतळा कल्याणकडे रवाना
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 1 कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे बसवण्यात येणारा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा पुर्णाकृती पुतळा कोल्हापूरहून कल्याणकडे रवाना करण्यात आला. कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साही वातावरणात पुतळा रवाना करण्यात आला.

कल्याण-डोंबिवली येथील काळा तलाव परिसरात बाळासाहेबांचे स्मारक साकारण्यात येत असून तेथे हा २२ फुटी पुतळा उभारण्यात येणार असून ८ जानेवारीला त्याचे अनावरण कोल्हापूर जवळील शिये (ता. करवीर) येथील शिल्पकार संताजी चौगले यांनी एक वर्षभर परिश्रम घेऊन हा पुतळा बनवला आहे.
यावेळी कल्याणचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेता राजेश मोरे, नगरसेवक सचिन व सुधीर बासरे, कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख जि. प. सदस्य बाजीराव पाटील उपस्थित होते.
https://www.dailymotion.com/video/x844myb