ठाण्यात संजय निरुपम यांचा पुतळा जाळला

By Admin | Updated: October 4, 2016 22:11 IST2016-10-04T22:04:47+5:302016-10-04T22:11:05+5:30

लष्कराच्या कामगिरीवर संशय घेणाऱ्या आणि देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांचा युवा सेनेने पुतळा जाळून निषेध केला.

The statue of Sanjay Nirupam was burnt in Thane | ठाण्यात संजय निरुपम यांचा पुतळा जाळला

ठाण्यात संजय निरुपम यांचा पुतळा जाळला

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 04 - लष्कराच्या कामगिरीवर संशय घेणाऱ्या आणि देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांचा युवा सेनेने पुतळा जाळून निषेध केला. 

पाकिस्तानकडून वारंवार होणा-या कारवायांना कंटाळून भारतीय लष्कर सेनेने काही दिवसांपूर्वीच सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. परंतु कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईक झालीच नाही, असे वक्तव्य करून लष्कराच्या कामगिरीवर संशय घेऊन देशद्रोही वक्तव्य केल्याने मंगळवारी वर्तक नगर नाका येथे युवा सेनेतर्फे संजय निरुपम यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
 
 
 
 
(फोटो - विशाल हळदे)
 

Web Title: The statue of Sanjay Nirupam was burnt in Thane