नवापुरात दरोड्यात स्टेशनमास्तर ठार

By Admin | Updated: March 7, 2016 03:45 IST2016-03-07T03:45:03+5:302016-03-07T03:45:03+5:30

रेल्वे स्टेशनमास्तर (स्थानकप्रमुख) ठार झाले तर त्यांची पत्नी जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. दरोडेखोरांनी ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

The stationmaster killed in a dump in Navapur | नवापुरात दरोड्यात स्टेशनमास्तर ठार

नवापुरात दरोड्यात स्टेशनमास्तर ठार

नवापूर (जि. नंदुरबार) : येथील शिवरामनगरमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात कोळदा येथील रेल्वे स्टेशनमास्तर (स्थानकप्रमुख) ठार झाले तर त्यांची पत्नी जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. दरोडेखोरांनी ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
प्रभातकुमार नागेश्वरसिंग (५२, मूळ रा. बिहार) हे शहरातील जुन्या सीमा परिवहन तपासणी नाक्यासमोरील शिवरामनगरमध्ये पत्नी सरिता व मुलगा मृणाल यांच्यासह राहतात. शनिवारी रात्री त्यांचे कुटुंबीय झोपले असताना एक वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा मागील दरवाजा कुणीतरी ठोठावला. मुलगा वरच्या मजल्यावर अभ्यास करीत होता. तोच खाली आला की काय, असे समजून सरिता यांनी दार उघडले. दार उघडताच ३५ ते ४० वयोगटातील दोघांनी बळजबरीने घरात प्रवेश केला. त्यांनी काळ्या रंगाची चड्डी व बनियान परिधान केले होते. त्यांनी घरात प्रवेश करताच सरिता यांनी आरडाओरड केली. प्रभातकुमारही तेथे धावून आल्याचे पाहून दोघा दरोडेखोरांनी त्यांना धमकावले.
प्रतिकार करणाऱ्या प्रभातकुमार यांच्या डोक्यावर व कपाळावर चाकूने वार करून जखमी केले. तरीही त्यांनी प्रतिकार सुरूच ठेवल्याने दुसऱ्या दरोडेखोराने त्यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने जोरदार प्रहार केला. त्यात ते गंभीर जखमी होऊन कोसळले. सरिता यांनाही मारहाण करीत दरोडेखोरांनी प्रत्येकी १० ग्रॅम वजनाचे व प्रत्येकी २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, चेन व कानातील टॉप्स, आठ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल लुटून नेले.

Web Title: The stationmaster killed in a dump in Navapur