शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचं राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन स्थगित; आदित्य ठाकरेंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 13:27 IST

कोरोनामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता राजकीय मेळावे, कार्यक्रमांवर निर्बंध आणण्यात आले आहेत.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रविवारी राज्यात १० हजाराहून अधिक रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी घेत अनेक राज्यांनी कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालसारखेच महाराष्ट्रात अंशत: लॉकडाऊन लागू शकते असे संकेत मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिले होते.

कोरोनामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता राजकीय मेळावे, कार्यक्रमांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येत्या ८ व ९ जानेवारी रोजी होणारं युवासेनेचं राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन स्थगित करत असल्याची माहिती युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रक काढून दिली आहे. या पत्रकात सांगण्यात आले आहे की, युवासेनेचे(YuvaSena) राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन झंझावात नाशिक येथे ८ व ९ जानेवारी रोजी आयोजित केले होते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यात वाढणारा ओमायक्रॉनचा प्रभाव आणि वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता तरुणांच्या व नागरिकांच्या आरोग्याची काळजी व राज्य सरकारच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करण्याच्या सूचना युवासेनाप्रमुख मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी दिल्या.

त्यामुळे युवासेनेचे राज्यव्यापी अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. युवासेनेच्या या अधिवेशनाची पुढील तारीख राज्यातील कोरोना परिस्थिती पाहून लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई(Varun Sardesai) यांनी पत्रक काढून दिली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध?

ओमायक्रॉनचा धोका पाहता पश्चिम बंगालमध्ये शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढली तर तीच स्थिती इथे निर्माण होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चाही झाली आहे. ते निर्बंधाबाबत निर्णय घेतील. यात एक पर्याय म्हणजे राज्यात काही ठिकाणी कन्टेन्मेंट झोन करुन तिथे प्रवेश बंदी केली जाईल. गर्दी होणार नाही त्याची दक्षता घेण्यात येईल. रेल्वेत जी गर्दी होतेय त्यावरही मुख्यमंत्री गंभीर आहेत. कॅबिनेट आणि टास्कफोर्सच्या बैठकीत यावर चर्चा होईल. निर्णय होणे अपेक्षित आहे अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेVarun Sardesaiवरुण सरदेसाईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस