अंगणवाडी सेविकांचे २ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन
By Admin | Updated: August 24, 2015 00:50 IST2015-08-24T00:50:55+5:302015-08-24T00:50:55+5:30
जीवघेण्या महागाईला तोंड देण्यासाठी मानधनात भरीव वाढ, थकीत मानधनप्राप्ती, बीडीएसची सुविधा या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील दोन

अंगणवाडी सेविकांचे २ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदोलन
ठाणे : जीवघेण्या महागाईला तोंड देण्यासाठी मानधनात भरीव वाढ, थकीत मानधनप्राप्ती, बीडीएसची सुविधा या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका २ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन छेडणार आहेत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी ही माहिती दिली.
संपात सहभागी झालेल्या या अंगणवाडी सेविका आझाद मैदानावर एकत्र येऊन मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. याशिवाय, २५ आॅक्टोबर रोजी अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष मंगला सराफ यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.