शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी राज्याचे धोरण निश्चित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 13:09 IST

प्रसूती पूर्व अपंगत्व निदान, दिव्यांगांचे आरोग्य, विशेष शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, त्यांच्या सांस्कृतिक गरज, क्रीडा गुणांचा विकास यांसह यांसह विविध महत्वपुर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देकेंद्र सरकारने २०१६ साली लागू केलेल्या दिव्यांग कायद्याच्या आधारे धोरण या धोरणामुळे प्रत्येक विभागाला दिव्यांग प्रति आपली जबाबदारी स्पष्ट होईलधोरणात अपंगांच्या विकासासाठी बऱ्याच जमेच्या बाबी असल्या तरी काही त्रुटीदेखील

पुणे : दिव्यांग सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने दिव्यांग धोरण निश्चित केले आहे. त्यामध्ये प्रसूती पूर्व अपंगत्व निदान, दिव्यांगांचे आरोग्य, विशेष शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, त्यांच्या सांस्कृतिक गरज, क्रीडा गुणांचा विकास यांसह यांसह विविध महत्वपुर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारने २०१६ साली दिव्यांग कायदा देशात लागू केला. त्या आधारे राज्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. या धोरणामुळे प्रत्येक विभागाला दिव्यांग प्रति आपली जबाबदारी स्पष्ट होईल. या धोरणामध्ये दिव्यांग मुलांच्या माता किंवा काळजीवाहक यांना घरगुती उपचार प्रशिक्षण देणे, त्वरीत हस्तक्षेप व निदान अंतर्गत आवश्यक त्या व्यंगनिदान शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, पाठ्यपुस्तकांमध्ये दिव्यांगांविषयी प्रकरणांचा समावेश, राजीव गांधी मुक्त शाळेमार्फत दहावीपर्यंत शिक्षण पुर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध करणे, राज्याच्या दिव्यांग जनगणणेच्या आकडेवारीवर एक प्रमुख नियोजन आराखडा तयार करणे, सर्व विद्यापीठात स्वतंत्र दिव्यांग अध्यासन केंद्र स्थापन करणे या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे दिव्यांग उद्योजकांना निवासी कार्यशाळा व कारखाने उभारण्यासाठी सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करणे, सामुहिक निवास योजनेसाठी मदत देणे, वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, पाच टक्के राखीव निधीमधील ५० टक्के निधी अतितीव्र दिव्यांग व्यक्तींच्या योजनांसाठी वापरणे अशा विविध बाबींही समाविष्ट करण्यात आल्या आहेत. -------------------अपंग कल्याणासाठी गेल्या पाच-सहा वर्षात अनेकदा धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. नुकतेच जाहीर केलेल्या धोरणात अपंगांच्या विकासासाठी बऱ्याच जमेच्या बाबी असल्या तरी काही त्रुटीदेखील आहेत. केवळ अपंग बालक, महिला व मानसिक अपंग व्यक्तींसाठी विशेष तरतूदी केल्याने सर्व प्रवगार्तील अपंगांचे पुनर्वसन होणार नाही त्यामुळे हे धोरण परिपुर्ण नाही. अपंग अधिकार कायद्यातील सर्व प्रवगार्तील अपंगांचे समांतर पुनर्वसन होणे गरजेचे आहे.- हरिदास शिंदे अपंग चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार