राज्याचे नवे टोल धोरण लवकरच! - चंद्रकांत पाटील
By Admin | Updated: November 23, 2014 02:08 IST2014-11-23T02:08:16+5:302014-11-23T02:08:16+5:30
भाजपाने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन दिले होत़े या आश्वासनपूर्तीसाठी सरकारने प्रयत्न सुरू केले

राज्याचे नवे टोल धोरण लवकरच! - चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : भाजपाने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन दिले होत़े या आश्वासनपूर्तीसाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असून, दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पांबाबत अभ्यास करण्यासाठी एक गट तयार केल्याची माहिती सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिली़
पाटील म्हणाले, राज्यात सध्या 2क्-3क् वर्षे मुदतीचे टोल धोरण आहे; पण आता तसे होणार नाही़ प्रकल्पाची किंमत किती, त्या
नाक्यावर दररोज जमा होणारी
रक्कम याचा हिशेब ठेकेदाराला
दररोज द्यावा लागेल. तशा
प्रकारचे सॉफ्टवेअर विकसित केले असून, प्रकल्पाची किंमत वसूल झाल्यानंतर ठेका आपोआपच
रद्द होईल, असे धोरण स्वीकारणार असल्याचेही सार्वजनिक
बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
सदाभाऊंना सबुरीचा सल्ला
सदाभाऊ खोत, राजू शेट्टी ही मंडळी चळवळीतील आहेत, शेतक:यांच्या प्रश्नाबाबत ते नेहमीच पोटतिडकीने बोलतात येथर्पयत ठीक आहे; पण सदाभाऊंनी शब्द जरा जपून वापरावेत, असा सबुरीचा सल्ला देत आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सदाभाऊंचा समावेश निश्चित असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.