शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच

By admin | Updated: December 14, 2015 00:31 IST

राज्यात काही भाग वगळता किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असून पुढील चार-पाच दिवस त्यात बदल होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सध्यातरी कडाक्याची थंडी जाणवणार नाही

पुणे : राज्यात काही भाग वगळता किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असून पुढील चार-पाच दिवस त्यात बदल होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सध्यातरी कडाक्याची थंडी जाणवणार नाही. दरम्यान, रविवारी राज्यात नाशिक येथे सर्वात कमी किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. नैर्ऋत्य अरबी समुद्र व लगतच्या भागावर असलेला कमी दाबाचा पट्टा अद्याप कायम आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असून थंडी कमी झाली आहे. पुढील दोन-तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात कोकणच्या काही भागात तापमानात सरासरीच्या किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्याचा काही भाग वगळता पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. रविवारी राज्यात नाशिक येथे सर्वात कमी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल जळगाव येथे १३.४ अंश तर नांदेड येथे १४.५ अंश सेल्सिअस किमान तापमाना होते. उत्तर भारतात राजस्थान, हरियाणा या राज्यांत थंडीची लाट असून पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच या भागात दाट धुके पडत असून, ही स्थिती आठवडाभर कायम राहण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)राज्याच्या प्रमुख शहरांचे किमान तापमानमुंबई (कुलाबा) २१.५ सांताक्रुझ १७.२ अलिबाग २०.१रत्नागिरी १९.५ डहाणू १७.६ पुणे १५.६अहमदनगर १५.६ कोल्हापूर १९.६महाबळेश्वर १७मालेगाव १५.४सांगली १९.६ सातारा १५.८ सोलापूर २१.४औरंगाबाद १६.५परभणी १८.१ अकोला १६.५ अमरावती १७.४बुलडाणा १६.८चंद्रपूर १९गोंदिया २०.६ नागपूर १६.५ वाशिम १७.२वर्धा १८यवतमाळ १८.४.