शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचा औद्योगिक विकासदर घसरला; राज्य सरकारची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 06:37 IST

वित्त आयोगाकडे अधिक निधीची मागणी

मुंबई : वीज, वायू, पाणी व अत्यावश्यक सुविधांअभावी प्रगतिशील महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात पीछेहाट होत असून २०१४-१५ मध्ये ८ टक्के असलेला औद्योगिक विकासदर २०१७-१८ मध्ये ६.५ टक्क्यांवर आला आहे. अनियमित पावसाने कृषी उत्पन्नातही २ टक्के घट होऊन हे उत्पन्न ११ टक्क्यांवर आले असल्याची कबुली राज्य सरकारनेच वित्त आयोगापुढे दिली. वाढते शहरीकरण व विभागीय समतोल राखण्यास आयोगाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.वित्त आयोगापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बाजू मांडली. महाराष्ट्रात येण्याआधीच्या आयोगाच्या प्रेसनोटवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित आकडे राज्याच्या लेखा महनिरीक्षकांनीच दिले होते. पण त्यात २०१६-१७ व २०१७-१८ ची तुलना नव्हती. शिवाय सिंचनाबद्दल आकडेवारी मिळेपर्यंत काही सांगणे शक्य नाही, असे आयोगाचे अध्यक्ष डॉ. एन. के. सिंग यांनी सांगितले. राज्यात भांडवली गुंतवणूक होत असली तरी भरपूर संधी आहे. विदर्भ, मराठवाड्यात अधिक गुंतवणुकीची गरज असून, राज्याची महसूलवृद्धी उत्तम असल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले.राज्याचा जमाखर्चराज्याचे सुमारे ५० टक्के महसुली उत्पन्न पगार, पेन्शन व व्याजावर खर्च होते. सातवा वेतन आयोग लागू करावा लागणार असल्याने सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात पगार व पेन्शनवरील खर्च आणखी वाढणार आहे.2016-17 मध्ये करांचा महसूल १,३६,६१६ कोटी रुपये होता. तो २०.८ टक्क्यांनी वाढून २०१७/१८ मध्ये १,६४,७९७ कोटी रुपये झाला. ही वाढ प्रामुख्याने ‘जीएसटी’मुळे झाली. चालू वर्षात करांचे उत्पन्न आणखी १४ टक्क्यांनी वाढून १,८८,०४० कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र