शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राज्याच्या विजेच्या ३२३२ मेगावॅट विक्रमी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 6:08 AM

विजेची मागणी अपेक्षेपेक्षा दुपटीने कमी : राज्यातील वीज पुरवठा अखंड ठेवण्यात यश

मुंबई : पंतप्रधानांनी घरातील विजेचे दिवे बंद करून दीपप्रज्वलनाचे आवाहन केल्याने रविवारी रात्री ९ ते ९.१० या काळात राज्यातील विजेची मागणी १७०० मेगावॅटने कमी होईल असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ही मागणी तब्बल ३२३२ मेगावॅटने घटली. मात्र, राज्यातील जलविद्यूत प्रकल्प आणि सेंट्रल एक्स्चेंजमधिल वीज पुरवठ्यात कौशल्यपुर्ण पध्दतीने ताळमेळ साधत महाराष्ट्र अंधारात बुडेल ही भीती राज्यातील वीज कंपन्यांनी खोटी ठरवली.

रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी राज्यातील विजेची मागणी १३ हजार १५६ मेगावॅट होती. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील जवळपास सर्वच भागातील जनतेने आपल्या घरातील विजेचे दिवे बंद करून दीपप्रज्वलन केले. त्यामुळे ९ वाजता विजेची मागणी ११ हजार ३०६ मेगावॅट इतकी खाली घसरली. त्यानंतर या मागणीत ९ वाजून १० मिनिटांपर्यंत ९ हजार ९९४ इतकी विक्रमी घट झाली. ९ .२० वाजता ही मागणी पुन्हा १२,३१० आणि ९.३० वाजता १२, ११८ पर्यंत वाढली. वीज कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा ही घट जास्त असली तरी राज्य आणि केंद्रिय पातळीवरून ग्रीडमधिल फ्रिक्वेन्सीत कुठेही बिघाड झाला नाही. त्यामुळे राज्यातला वीज पुरवठा अखंड सुरू राहिला.

जलविद्यूत प्रकल्पाची कमालराज्यातील विजेच्या मागणीतला हा चढ उतार कोयना जलविद्यूत प्रकल्पाच्या माध्यमातून कौशल्याने हाताळण्यात आला.शनिवारी रात्री ९ वाजता या प्रकल्पातून ५५३ मेगावॅट निर्मिती झाली होती तर, सेंट्रल एक्स्चेंजकडून ५०५७ मेगावॅट वीज घेतलीहोती. मात्र, रविवारी सेंट्रल एक्स्चेंजची वीज कमी करून कोयनाची वीज निर्मिती वाढविण्यात आली. ८ वाजून ५० मिनिटांनी कोयनेची वीज १८३२ मेगावॅटपर्यंत पोहचली होती.

मागणी कमी झाल्यानंतर ९ वाजता ती ५५४ आणि ९ वाजून १० मिनिटांनी ४१४ पर्यत कमी करण्यात आली. ९ वाजून २० मिनिटांनी त पुन्हा १७३९ आणि ९ वाजून ३० मिनिटांनी १८०४ मेगावॅटपर्यंत पुन्हा वाढली. याच कालावधीत औष्णिक वीज प्रकल्पांतूनही आवश्यकतेनुसार वीज निर्मिती कमी- जास्त करण्यात आली. शनिवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी सेंट्रल एक्स्चेजमधील वीज पुरवठा ५०५७ मेगावॅट होता.रविवारी त्याच वेळी तो ३०६० इतका कमी करण्यात आला होता. विजेची मागणी सुरळीत झाल्यानंतर त्यानंतर टप्प्याटप्प्याने कोयनेची वीज निर्मिती कमी करण्यात आली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज