शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘कोरोनाच्या सर्वाधिक मृत्युमुळे राज्याचा अपमान’; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 08:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्यावरून काँग्रेसने राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये प्रेते नव्हती, गंगेत दिसली असे म्हणत पंतप्रधानांंवर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळले आणि सर्वाधिक मृत्यू झाले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्यावरून काँग्रेसने राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये प्रेते नव्हती, गंगेत दिसली असे म्हणत पंतप्रधानांंवर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले, एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोनाच्या लाटेत परप्रांतीय मजुरांना भरवसा देण्यात राज्याचे सरकार कमी पडले व त्यामुळे त्यांनी पलायन केले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. या सर्वांचा जाब खरे तर काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा होता. त्यांच्याकडे माफीची मागणी करायला हवी होती, असे पाटील म्हणाले.भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला सहजासहजी घेणार नसल्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला. रोज उठून धमक्या देण्याचे काम राऊत यांनी बंद करावे. सोमय्या, देवेंद्र फडणवीस, पाटील हे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करतायत असे वाटत असेल तर तुम्हालाही न्यायालयात जायचा अधिकार आहे, असे पाटील म्हणाले. 

काय बोलतो याचे भान बाळगा : अजित पवार  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. आपण काय बोलतो याचे भान बाळगले पाहिजे, उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी पाटील यांना उत्तर दिले. अजित पवार यांनी लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचे काम केल्याचा आरोप पाटील यांनी अलीकडेच केला होता.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसchandrakant patilचंद्रकांत पाटीलcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतcorona virusकोरोना वायरस बातम्या