राज्याचे सरासरी किमान तापमान 12 अंशांवर
By Admin | Updated: November 27, 2014 02:11 IST2014-11-27T02:11:03+5:302014-11-27T02:11:03+5:30
उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग काहीसा वाढल्याने राज्यात आता थंडीने चांगलेच बस्तान बसविले आहे.

राज्याचे सरासरी किमान तापमान 12 अंशांवर
मुंबई : उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग काहीसा वाढल्याने राज्यात आता थंडीने चांगलेच बस्तान बसविले आहे. परिणामी पुणो, अहमदनगर, जळगाव, नाशिक, सातारा, उस्मानाबाद, नांदेड, गोंदिया, नागपूर अशा प्रमुख शहरांचा किमान तापमानाचा पारा खाली घसरला असून, या शहरांचे गुरुवारी सरासरी किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले आहे.
मुंबईसह राज्यभरात नोव्हेंबरच्या उत्तरार्धाथ थंडीने चांगला जोर पकडला आहे. मुंबईवगळता राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान 11 ते 12 अंशांवर येऊन ठेपले असून, मुंबईत मात्र किमान तापमानाचा पारा अद्यापही 2क् ते 21 अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. डिसेंबरच्या पंधरवडय़ात मुंबईचे किमान तापमान 16 अंशांर्पयत खाली उतरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)