शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

राज्यातील ५९ कारखाने साखर उताऱ्यात उणे : एफआरपीला येणार अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 12:25 IST

राज्यातील १०१ सहकारी आणि ९२ खासगी असे १९३ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्दे ११ कारखान्यांचा साखर उतारा ९ टक्क्यांच्या खालीयंदाच्या हंगामात देशात ३०७ लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाजपाठोपाठच्या वर्षी देशात भरघोस साखर उत्पादित होणार असल्याने साखरेला सध्या नाही भाव

पुणे : उसाची रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यासाठी साखर उतारा हा एक महत्त्वाचे प्रमाण मानले जाते. मात्र, राज्यातील तब्बल ५९ साखर कारखान्यांची साखर उताऱ्याची सरासरी दहा टक्के देखील नाही. त्यातील ११ कारखान्यांना तर नऊ टक्के देखील सरासरी गाठता आली नाही. त्यामुळे या कारखान्यांना एफआरपीचा टक्का गाठताना चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे साखर क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. राज्यातील १०१ सहकारी आणि ९२ खासगी असे १९३ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सिद्धनाथ नगर, फॅबटेक शुगर्स, नाशिकचा केजीएस शुगर आणि हिंगोलीचा शिऊर कारखान्याचे धुराडे बंद झाले आहे. तर, १५ फेब्रुवारी अखेरीस ७५७.२८ लाख टन ऊस गाळपातून ८२ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. राज्याचा सरासरी उतारा हा १०.९६ टक्के इतका आहे. यंदाच्या हंगामात देशात ३०७ लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज असून, राज्यात ९५ लाख टन साखर उत्पादित होईल. पाठोपाठच्या वर्षी देशात भरघोस साखर उत्पादित होणार असल्याने साखरेला सध्या भाव नाही. केंद्र सरकारने १० टक्के साखर उताऱ्यासाठी २७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर केला आहे. तर, त्या पुढील प्रत्येक टक्क्यासाठी २७५ रुपये देण्यात येणार आहेत. हंगाम अखेरीस राज्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्के इतका आहे. त्यामुळे सरासरी एफआरपी देखील ३ हजार रुपयांच्या आसपास जाते. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत २९०० रुपयांवरुन ३१०० रुपये प्रतिक्विंटल केली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा कारखान्यांना मिळेल. साखर उतारा सरसरी ८ ते ९ टक्के आणि ९ ते १० टक्क्यांदरम्यान असलेल्या कारखान्यांना एफआरपीचा आकडा गाठण्यासाठी अधिक कसरत करावी लागेल. तर, ८ ते साडेआठ टक्के साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांना तर प्रसंगी तोटाही होऊ शकतो असे साखर क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. -------------------सरासरी साखर उतारा ९ टक्क्यांखालील असलेले कारखाने

कारखाना                टक्कामाणगंगा-सांगली            ३.६७लोकमंगल अ‍ॅग्रो-सोलापूर    ८.३४लोकमंगल शुगर-सोलापूर    ८.२३साईकृपा-२ अहमदनगर        ७.७४केजीएस शुगर-नाशिक        ८.६८अंबाजी (बेलगंगा)-जळगाव    ३.७४लोकमंगल माऊली-उस्मानाबाद ८.३६जयलक्ष्मी शुगर्स-उस्मानाबाद    ८.०५साईबाबा-लातूर            ८.८६सागर वाईन-यवतमाळ        ८.०२महात्मा-वर्धा            ८.९१        

    

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार