राज्य महिला आयोगाने नोंदविला पीडित युवती व आरोपीचा जबाब

By Admin | Updated: September 12, 2014 01:23 IST2014-09-12T01:23:43+5:302014-09-12T01:23:43+5:30

अकोला येथील लैंगिक शोषण प्रकरणातील पीडीत युवतीचा जबाब नोंदविला.

State Women's Commission has recorded the statement of the victim and the accused | राज्य महिला आयोगाने नोंदविला पीडित युवती व आरोपीचा जबाब

राज्य महिला आयोगाने नोंदविला पीडित युवती व आरोपीचा जबाब

अकोला : बलात्कारप्रकरणातील आरोपी युवक व पीडित युव तीचा ९ सप्टेंबर रोजी राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी जबाब नोंदविला. जबाबामध्ये लग्न करून युवकाने तिचे सातत्याने लैंगिक शोषण केले आणि नंतर त्याने संसार करण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे.
शहरातील एका ज्वेलर्समधील २३ वर्षीय युवतीसोबत इटारसी येथील मोहनिश अनिल खंडेलवाल (२८) याने लग्नाचे नाटक करून तिच्यावर सातत्याने बलात्कार केला.
या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपीचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने, पीडित युवतीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार ९ सप्टेंबर रोजी राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी आरोपी मोहनिश खंडेलवाल याच्यासह पीडित युवतीचाही जबाब नोंदविला.

** राज्य महिला आयोगाचा ब्रेन मॅपिंगसाठी पुढाकार
बलात्कार प्रकरणातील पीडिता व आरोपी युवक आपापली बाजू मांडत आहेत. त्यामुळे कोण खरे व कोण खोटे आहे. त्यासाठी दोघांचीही ब्रेन मॅपिंग होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी पुढाकार घेतला आहे; परंतु ब्रेन मॅपिंगसाठी प्रचंड खर्च आहे. तो कोण करणार, हा प्रश्न आहे; परंतु राज्य महिला आयोग, शासनाने ब्रेन मॅपिंगला संमती दिली तर ब्रेन मॅपिंगचा राज्यातील पहिला
निर्णय ठरेल.

Web Title: State Women's Commission has recorded the statement of the victim and the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.