राज्यात विभागनिहाय रोहिदास भवन उभारणार - सामाजिक न्याय मंत्री

By Admin | Updated: January 6, 2016 01:55 IST2016-01-06T01:55:09+5:302016-01-06T01:55:09+5:30

राज्यात विभागनिहाय रोहिदास भवन उभारू, असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी

State-wise Rohidas Bhawan to be built - Social Justice Minister | राज्यात विभागनिहाय रोहिदास भवन उभारणार - सामाजिक न्याय मंत्री

राज्यात विभागनिहाय रोहिदास भवन उभारणार - सामाजिक न्याय मंत्री

मुंबई : राज्यात विभागनिहाय रोहिदास भवन उभारू, असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चर्म उद्योगासाठी व सामाजिक कार्यासाठी संत रोहिदास भवनाची निर्मिती करण्याची मागणी महाराष्ट्र चर्मकार परिषदेने केली होती.
चर्मकार परिषदेचे अध्यक्ष वाय.सी. पवार यांनी सांगितले की, चर्मकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात सामाजिक न्याय मंत्र्यांसोबत परिषदेची बैठक पार पडली. त्यात परिषदेने चर्मकार समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले. दरम्यान झालेल्या चर्चेत जिल्हानिहाय संत रोहिदास भवन उभारणे शक्य नसून विभागनिहाय भवन उभारण्याचा निर्णय येत्या महिन्याभरात जाहीर करण्याचे आश्वासन बडोले यांनी दिले.
शिवाय राष्ट्रीय फेरीवाला सर्वेक्षणाप्रमाणे चर्मकारांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून त्यांना २ बाय ३ चौरस मीटरचा स्टॉल बनवून देण्याची मागणी परिषदेने केली होती. तीही मंत्री महोदयांनी मान्य केली आहे.
सामाजिक न्याय मंत्र्यांनी परिषदेच्या एकूण ६ मागण्या मान्य केल्याचे कार्यकारिणी सदस्य रघुवीर तुरेकर यांनी सांगितले. तुरेकर म्हणाले की, मान्य झालेल्या सर्व मागण्या लवकरच जाहीर केल्या जातील.

Web Title: State-wise Rohidas Bhawan to be built - Social Justice Minister