राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळ होणार स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:11 PM2020-03-04T23:11:52+5:302020-03-04T23:12:14+5:30

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्तीनंतर शिक्षणमंत्र्याची पालकांना हमी

The state will be formed to be an international educational board | राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळ होणार स्थापन

राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळ होणार स्थापन

Next

 

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई 

कोणताही भेदभाव न करता एकसारखे व उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. नुकताच सरकारकडून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर पालक, शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी पालकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसल्याचे स्पष्टीकरण देत ही माहिती दिली. 

राज्यात जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 66 हजार 033 शाळा कार्यरत आहेत. त्यामधील 81 शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुरू होते. त्याऐवजी फक्त 81 शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण न देता जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये ते देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या मंडळाकडून सुधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार असून पहिल्या वर्षी या 81 शाळांतील पाचवीच्या इयत्तेसाठी आणि नंतर राज्यातील सर्वच शाळांसाठी असा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम तयार करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. 

बरखास्त करण्यात आलेल्या शाळांमधील पालकांनी घाबरण्याचे करण नसून सरकारने आनंददायी व रचनात्मक उपक्रम लवकरच सगळ्या शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याची हमी त्यांनी दिली. शिक्षण मंडळ बरखास्त झाले तरी या शाळा बंद होणार नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी शिक्षणमंत्री म्हणून त्या स्वतः घेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: The state will be formed to be an international educational board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.