राज्याला पावसाने झोडपले

By Admin | Updated: November 15, 2014 02:19 IST2014-11-15T02:19:22+5:302014-11-15T02:19:22+5:30

मुंबई, कोकण, दक्षिण महाराष्ट्र, जळगावसह राज्याच्या काही भागाला शुक्रवारी बेमोसमी पावसाने झोडपले. कोल्हापूरसह सांगली, साता:याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे.

The state was overwhelmed by rain | राज्याला पावसाने झोडपले

राज्याला पावसाने झोडपले

मुंबई : मुंबई, कोकण, दक्षिण महाराष्ट्र, जळगावसह राज्याच्या काही भागाला शुक्रवारी बेमोसमी पावसाने झोडपले. कोल्हापूरसह सांगली, साता:याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. 
गुरुवारी रात्री तसेच शुक्रवारी सायंकाळी मुंबईत काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. 
कोल्हापूरसह सांगली, सातारा आज, शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोल्हापुरातील गु:हाळघरांवर, कारखान्यांच्या हंगामावर परिणाम झाला आहे, तर सांगलीतील द्राक्षबागांवर दावण्या व करप्या रोगाची लागण होण्याची शक्यता आहे. साता:यातील अवकाळी पावसाच्या हजेरीचा मोठा फटका महाबळेश्वर, पाचणगीसह जावळी खो:यातील स्ट्रॉबेरीच्या पिकांवर पडला आहे. मायणी भागात अनेक ठिकाणी द्राक्ष बागांचेही नुकसान झाले. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, खानापूर, पलूस तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसला आहे. अमळनेर व मारवड येथे पावसामुळे धावपळ उडाली.   (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
जळगावमध्ये धान्याचे नुकसान 
जळगाव जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारोळ्यात विजांच्या कडकडाटासह तर चाळीसगावला अडीच तास दमदार पाऊस झाला. पारोळा बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली ज्वारी, मका यांचे नुकसान झाले.
 
नगरमध्ये रब्बीला दिलासा
अहमदनगरमध्ये एकीकडे ज्वारी, हरभरा पिकांना हा पाऊस फायदेशीर आहे.  तर अनेक ठिकाणी नुकसानकारक आहे. नगरसह, शेवगाव, पाथर्डी, जामखेड या दुष्काळी भागात अवकाळी पावसाने दिलासा दिला.

 

Web Title: The state was overwhelmed by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.