शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

राज्य गुप्तवार्ता अधिकारी परीक्षेत कॉपी, शेगावात ३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 6:36 AM

राज्य गुप्तवार्ता विभागासाठी सहायक गुप्तचर अधिकारी (एआयओ) या पदासाठी १३ जुलै रोजी राज्यात घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी, शेगाव येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या केंद्रावर मोबाइल फोनद्वारे कॉफी करण्याचा प्रयत्न झाला.

बुलडाणा/खामगाव : राज्य गुप्तवार्ता विभागासाठी सहायक गुप्तचर अधिकारी (एआयओ) या पदासाठी १३ जुलै रोजी राज्यात घेण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी, शेगाव येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या केंद्रावर मोबाइल फोनद्वारे कॉफी करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील दोन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एक अशा तीन जणांना शेगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना१६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सूरजसिंग सुपडासिंग हुसिंगे (२३, रा. डावरगाव, ता. बदनापूर, जिल्हा जालना), गोपाल कृष्णा जंजाळ (२७, रा. चिंचपूर, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद)आणि विलास लक्ष्मण जारवाल (२१, रा. सागरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) अशी त्यांचीनावे आहेत.बुलडाणा येथील शाहू कॉलेज आणि शेगाव येथील उपरोक्त कॉलेजात या परीक्षेचे केंद्र होते. शेगाव येथील केंद्रावर ९७ पैकी ७२ उमेदवार परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षेच्या तिसऱ्या सत्रात तिघांनी मोबाइलद्वारे संगणकाच्या स्क्रीनवरील फोटो काढून ते व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अन्यत्र पाठवून कॉपी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार केंद्रावरील परीक्षा अधिकाºयांच्या लक्षात येताच, त्यांनी त्वरित तिघांचेही मोबाइल जप्त व संगणक बंद करून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.

टॅग्स :Arrestअटक