शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजपा-मनसे युतीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; राज ठाकरेंची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 19:52 IST

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका घेतली आहे. त्याबाबत जनता निर्णय घेईल असं बावनकुळे म्हणाले.

मुंबई - राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला. विधानसभेत मनसेच्या एकमेव आमदारानं सरकारच्या बाजूने मतदान केले. आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे-भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात जी परिस्थिती समोर येईल तसा निर्णय घेऊ असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी युतीवर अधिक भाष्य करणं टाळलं. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका घेतली आहे. त्याबाबत जनता निर्णय घेईल. जनतेला काय स्वीकारार्ह आहे ते मतपेटीतून समोर येईल. पक्ष वाढवण्यासाठी, पक्षाला बळ देण्यासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून खूप दूर गेलेत. ४० आमदारांना सोडायला तयार आहेत परंतु सत्ता आणि शरद पवारांना उद्धव ठाकरे सोडत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नवाब मलिकांच्या भूमिकेवरून उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या दूर गेलेत हे सिद्ध झाले असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच भाजपा-शिवसेनेच्या युतीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पार्टनर आहेत. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात घौडदोड केली तर पुढे बघू. राज ठाकरेंसोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत. व्यक्तिगत संबंधात राजकारण येत नाही. राज ठाकरेंना मी भेटायला जाणार आहे. प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका असते. राज ठाकरेंच्या भूमिकेवर राज्यातील जनतेला काय वाटतं हे आम्ही सांगू शकत नाही. मनसेला सोबत घेण्याबाबत आज भाष्य करू शकत नाही. जसजशी परिस्थिती समोर येईल त्यावर निर्णय होऊ शकतो असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

मनसेचं आक्रमक हिंदुत्व भूमिकागेल्या काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका स्वीकारल्याचं दिसून येत आहे. अलीकडेच भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या भूमिकेवरून देशासह जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर नुपूर शर्मा यांना भाजपानं पक्षातून काढून टाकलं. त्यानंतर अलीकडेच राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांची थेट पाठराखण केली. जे इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक बोलतो तेच नुपूर शर्मा बोलल्या. त्यात चुकलं कुठे? असा सवाल राज यांनी उपस्थित केला होता.  

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे