शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे राजकारण ‘अलर्ट माेड’वर; सत्तासंघर्षावरील ‘सर्वाेच्च’ फैसला पुढील आठवड्यात अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 07:56 IST

येत्या २० मे पासून सुरू होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या ३ जुलैपर्यंत राहणार आहेत.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने पुढचा आठवडा निर्णायक ठरेल. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने १७ मार्चपासून राखून ठेवलेला निकाल येत्या ८ ते १२ मे दरम्यान केव्हाही लागू शकतो. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या या निकालाचे राज्यात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे १४ फेब्रुवारीपासून १२ दिवस सुनावणी झाली. त्यावर घटनापीठाने १६ मार्च रोजी निर्णय राखून ठेवला. 

येत्या २० मे पासून सुरू होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या ३ जुलैपर्यंत राहणार आहेत. तत्पूर्वी, या घटनापीठाचे सदस्य असलेले न्या. शहा १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल त्यापूर्वी लागणे अपेक्षित आहे. न्या. शहा यांच्या निवृत्तीपूर्वी १३ आणि १४ मे रोजी न्यायालयाचे कामकाज शनिवार आणि रविवारी बंद राहणार असल्यामुळे निकाल जाहीर करण्यासाठी ८ ते १२ मे हाच कालावधी शिल्लक राहतो.

कर्नाटकनंतरच? कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार ८ मे रोजी संपणार आहे तर मतदान १० मे रोजी होणार आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाचा कर्नाटक निवडणुकीवरील परिणाम टाळायचा झाल्यास ८ ते १० मे दरम्यानच्या काळात निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा नाही. अशा स्थितीत निकाल ११ ते १२ मे या दोन दिवसांत लागू शकतो, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदे