शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
2
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
3
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
4
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
5
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
9
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
10
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
11
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
12
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
13
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
14
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
15
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
16
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
17
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
18
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
19
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
20
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली

राजकीय ‘डाव’खरे पर्वाचा अस्त

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

शिवसेना, भाजपामधील मित्रांच्या मदतीने आपले राजकीय ‘डाव’खरे करणारे राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांना पराभूत करून शिवसेनेने ठाण्यातील डावखरे पर्व संपुष्टात आणले.

अजित मांडके,

ठाणे- आजवरच्या चार निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजपामधील मित्रांच्या मदतीने आपले राजकीय ‘डाव’खरे करणारे राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांना पराभूत करून शिवसेनेने ठाण्यातील डावखरे पर्व संपुष्टात आणले.ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादीकडे १९९, काँग्रेसकडे १०३ आणि बहुजन विकास आघाडीकडे ११९ असे ४२१ मतांचे बळ डावखरेंकडे होते. याचा अर्थ डावखरेंच्या विजयाची भिस्त पूर्णपणे बविआवर होती. शिवसेनेचे ३११, भाजपा १८० अशी ४९१ मते युतीकडे होती. उरलेल्या मतांमध्ये रिपाइंचे ८, अपक्ष ४८, मनसे २०, बसपा ५, सपा १७, एमएमआय १, कोणार्क विकास आघाडी ७, सेक्युलर अलायन्स आॅफ इंडिया ४ आणि डाव्यांची ५ मते होती. मतमोजणीअखेर डावखरेंच्या पारड्यात ४५० मते पडली. याचा अर्थ डावखरे यांना अतिरिक्त २९ मते मिळाली तर फाटकांच्या पारड्यात ६०१ मते पडली. याचा अर्थ फाटकांनी त्यांच्याकडील मते सांभाळून बाहेरून ११० मते मिळवली. फाटक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व बविआची मते खेचली असतील, तर तो डावखरे यांच्याकरिता मोठा धक्का असेल. ठाण्यासकट नवी मुंबई आणि वसई-विरार पट्ट्यात शिवसेनेने मतांची आघाडी घेतल्याचे सांगण्यात येते. >डावखरे एकाकी लढलेडावखरे यांच्या प्रचाराकरिता ठाण्यात आलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनीदेखील निवडणुकीची सर्वच गणिते आमच्या बाजूने नसल्याचे सूचक वक्तव्य केले होते. जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक हे पक्षातील नेते डावखरे यांच्यासोबत नव्हते. मतमोजणीच्या दिवशीदेखील त्यांच्यासोबत पक्षातील नेते नव्हते.ज्या शिवसेनेने डावखरे यांना नेहमी साथ दिली, त्याच शिवसेनेने त्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यांच्या पराभवामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाणे राष्ट्रवादीत ‘डावखरे गट’ दिसणार की, त्यांचे समर्थक स्वपक्षीय नेते किंवा अन्य पक्षात आसरा घेणार, ते येणारा काळ ठरवेल, असे बोलले जात आहे.