राज्य शासनाचे संस्कृत पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: November 28, 2015 01:49 IST2015-11-28T01:49:09+5:302015-11-28T01:49:09+5:30
संस्कृत भाषेतील अपूर्व योगदानासाठी देण्यात येणारे राज्य शासनाचे महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.

राज्य शासनाचे संस्कृत पुरस्कार जाहीर
मुंबई : संस्कृत भाषेतील अपूर्व योगदानासाठी देण्यात येणारे राज्य शासनाचे महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.
प्राचीन संस्कृत पंडित या वर्गवारीतील पुरस्कारासाठी अशोक विष्णू कुलकर्णी, तर वेदमूर्ती वर्गवारीतील पुरस्कारासाठी मनोज बालाजी जोशी यांची निवड केली आहे. अन्य राज्यांतील संस्कृत पंडित म्हणून डॉ. सिद्धार्थ वाय. वाकणकर यांना गौरविण्यात येणार आहे. इतर पुरस्कार प्राप्तकर्त्यांची नावे संस्कृत शिक्षक व इतर या वर्गवारीसाठी मंगला सोमनाथ गुडे (विश्वेकर), दत्ताराम तुकाराम नंदापुरे, संस्कृत प्राध्यापक व तत्सम अभ्यासक - डॉ. शारदा रमेश गाडगे व डॉ. छाया रावसाहेब पालकर, संस्कृत कार्यकर्ता प्रभा श्रीकृष्ण घुले यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे आहे. (विशेष प्रतिनिधी)