राज्य सरकारचं नवीन खातेवाटप जाहीर

By Admin | Updated: July 9, 2016 23:23 IST2016-07-09T22:25:40+5:302016-07-09T23:23:33+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची यादी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सोपवली आहे. यामध्ये विनोद तावडे यांच्याकडे असलेलं वैद्यकीय शिक्षण खातं काढून गिरीश

State Government's new account announcement | राज्य सरकारचं नवीन खातेवाटप जाहीर

राज्य सरकारचं नवीन खातेवाटप जाहीर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची यादी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सोपवली आहे. या नवीन खाते वाटपात विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याकडे असलेली महत्वाची खाती काढून घेतली आहेत. विनोद तावडे यांच्याकडे असलेलं वैद्यकीय शिक्षण खातं काढून गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आल्याचे समजते. तर, पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खातं काढून राम शिंदे यांच्याकडे दिले आहे. तसेच, शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याकडे ग्रामीण गृहराज्यमंत्री तर जयकुमार रावल यांच्याकडे पर्यटन आणि रोजगार हमी योजना खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवीन खाते वाटप पुढील प्रमाणे -

चंद्रकात पाटील- महसूल आणि सार्वजनिक बांधकाम
दीपक केसरकर- गृह राज्यमंत्री (ग्रामीण)
जयकुमार रावल- रोजगार हमी योजना, पर्यटन
गिरीश महाजन- वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा
महादेव जानकर- पशु संवर्धन आणि दुग्ध विकास (कॅबिनेट)
गुलाबराव पाटील- राज्यमंत्री सहकार
पाडुंरंग फुंडकर- कृषीमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे- उर्जा, उत्पादन शुल्क
संभाजी निलंगेकर- कामगार, कौशल्य विकास (कॅबिनेट)
सुभाष देशमुख- वस्त्रोद्योग, पणन, सहकार (कॅबिनेट)
अर्जुन खोतकर- पशु संवर्धन आणि दुग्ध विकास (राज्यमंत्री)
रविंद्र चव्हाण- बंदरे आणि आरोग्य राज्यमंत्री
राम शिंदे- जलसंधारण (कॅबिनेट)
सदाभाऊ खोत- कृषी आणि पणन (राज्यमंत्री)
मदन येरावार – उर्जा व पर्यावरण (राज्यमंत्री)
 
 

 

Web Title: State Government's new account announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.