शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

राज्य सरकार करणार लसनिर्मिती, हाफकिनला मान्यता देण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:11 IST

पंतप्रधान मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी दृूरदृष्य प्रणालीद्वारे संपर्क साधला. राज्यात अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळाल्यास लसीकरणाचा वेग वाढवता येईल.

मुंबई : कोरोनाच्या लसची निर्मिती स्वत: करण्याची तयारी आता राज्य सरकारने सुरू केली असून, शासनाच्या अखत्यारितील हाफकिन इन्स्टिट्यूटला लसनिर्मितीसाठी मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. (The state government will manufacture the vaccine, the chief minister asked the prime minister to approve Halfkin)

पंतप्रधान मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी दृूरदृष्य प्रणालीद्वारे संपर्क साधला. राज्यात अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळाल्यास लसीकरणाचा वेग वाढवता येईल. त्यासाठी हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी द्या, असे साकडे ठाकरे यांनी यावेळी घातले. त्याला लगेच प्रतिसाद देत, सर्वच राज्यांमधील लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ देण्याची केंद्राची भूमिका असेल, असे मोदी यांनी जाहीर केले. 

राज्यात दररोज तीन लाखांपर्यंत लसीकरण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. हाफकिनमार्फत १२६ दशलक्ष लसी उत्पादित होऊ शकतात. राज्यात सध्या १ लाख ३८ हजार लसी दररोज सरासरी दिल्या जात आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत लसीकरण तसेच आरटीपीएस चाचण्यांचे प्रमाण समाधानकारक आहे; मात्र ते आणखीही वाढवावे, असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी यावेळी सांगितले. सर्व आरोग्य व पालिका यंत्रणांना परत एकदा युद्ध पातळीवर संपर्क शोधण्याचे काम हाती घेण्यास सांगण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रात १ मार्च रोजी ७ हजार ७४१ इतके रुग्ण वाढले होते. १५ मार्च रोजी हा एकदा १३ हजार ५२७ इतका झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून, १ मार्च रोजी पॉझिटिव्हिटी दर १० टक्के होता तो आता १६ टक्के झाला आहे, यावर चाचण्यांची संख्या अधिक वाढविणे गरजेचे आहे, असे सादरीकरच्या वेळी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले.यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते.

साठा वाढवून द्या!राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोसेस देण्यात आले असून, ३१ लाख ३८ हजार ४६३ डोसेस उपलब्ध आहेत. दररोज ३ लाख डोसेस दिल्यास १० दिवसांचा साठा असून, तो अधिक वाढवून मिळावा. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी