शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने आता जेवणासाठी रेस्टॉरंट्स खुली करावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 14:40 IST

मुंबईसह महाराष्ट्रात या व्यवसायावर पाच लाखांहून अधिक जणांचे कुटुंबे अवलंबून आहेत.

ठळक मुद्देअन्यथा चाळीस टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याचा धोका निर्माण

पुणे : राज्यातील रेस्टॉरंट्समधून आजमितीला फक्त पार्सल सेवा सुरु आहे. परंतु, ती तितकी पुरेशी नाही. रेस्टॉरंट व्यावसायिकांना त्यातून फारसे उत्पन मिळत नाही. मुंबईसह महाराष्ट्रात या व्यवसायावर पाच लाखांहून अधिक जणांचे कुटुंबे अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे फिरतीवर असणाऱ्या अनेक नागरिकांकरिता रेस्टॉरंटमधील जेवण सुरु होणे आवश्यक आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात जेवणासाठी रेस्टॉरंट्स सुरु करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. आता राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा चाळीस टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना लॉकडाऊनकाळात रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद होती. मात्र त्यानंतर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात पार्सल सेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात जेवणासाठी रेस्टॉरंट्स खूली करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा चाळीस टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

सरकारने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून रेस्टॉरंट्स चालू केली जावीत. सामायिक अंतर राखावे, वस्तू हाताळण्यापूर्वी निर्जंतुकीकरण व्हावे, आदी नियमांसाठी तसेच कर्मचारी आणि ग्राहक यांच्या आरोग्याची दक्षता घेण्याबाबत रेस्टॉरंट व्यवसायिकांनी तयारी दर्शविली आहे. सरकारने त्याप्रमाणे कडक बंधनेही घालावी. मात्र, आता लवकरात लवकर गेले सहा महिने या व्यवसायाची सुरू असलेली कोंडी दूर व्हावी. रेस्टॉरंट व्यवसायावर दूध, भाजीपाला, धान्य पुरवठादार आदी व्यापारी अवलंबून असतात. रेस्टॉरंट्स खुली केल्यास त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल, कराद्वारे सरकारचे उत्पन्न वाढेल.सरकारने खाजगी बससेवा, लॉजेस, एसटी बससेवा यांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे रेस्टॉरंट्सचाही विचार व्हावा असे निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेhotelहॉटेलfoodअन्नbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या