शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लतादीदी, सचिनसह सेलिब्रिटींच्या टि्वटची चौकशी होणार; गृहमंत्री देशमुख यांचं काँग्रेसला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 08:23 IST

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी झूमवर संपर्क करून ‘त्या’ ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली होती.

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह इतर सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात कुणाच्या दबावाखाली ट्विट केले होते का, याची चौकशी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाकडून करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी काँग्रेसला दिले.काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी झूमवर संपर्क करून ‘त्या’ ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी प्रत्युत्तर दिले होते. त्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षयकुमार, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आदींचा समावेश होता. अक्षयकुमार आणि सायनाच्या ट्विटमधील शब्दन् शब्द सारखे आहेत. तर अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या ट्विटमध्ये मुंबई भाजपच्या उपाध्यक्षांचा उल्लेख केला आहे. या सेलिब्रिटींना भाजपने प्रवृत्त केले होते का, भाजपचा त्यांच्यावर दबाव होता का, या अनुषंगाने चौकशी व्हावी, अशी मागणी सावंत यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली होती. गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलन शांततेत सुरू असताना ते बदनाम करण्याचे प्रयत्न केले गेले. भाजपवर टीका केली म्हणून सीबीआय, ईडीची चौकशी केली जाते. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले. त्यावर भारतीय सेलिब्रिटींनी कुणाच्या दबावाखाली ट्विट केले काय, याची चौकशी राज्य गुप्तवार्ता विभागामार्फत केली जाईल.भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाही. निषेध करावा तितका थोडाच. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मान्य करणारे यांचीच चौकशी झाली पाहिजे.    - देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते

 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरSachin Tendulkarसचिन तेंडुलकरAnil Deshmukhअनिल देशमुखSachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलन