शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्यासाठी राज्य सरकारने पुरेसे काही केले नाही - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 16:12 IST

सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२० मध्ये राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र सरकारने पुरेसे काम केले नाही.

मुंबई - राज्यभरातील पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी राज्य सरकारने पुरेसे काही केले नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले की ते दरवेळी कारणे देऊन टाळतात, असे निरीक्षण न्या. एस. जे. काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने सोमवारी नोंदविले. हे सर्व जाणुनबुजून केले जात आहे, असे न्यायालयाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर २०२० मध्ये राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र सरकारने पुरेसे काम केले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश वाचण्याची कोणी तसदी तरी घेतली का? तुम्हाला (राज्य सरकार) सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळावे लागतील, असे न्या. काथावाला यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उद्देश पारदर्शकता निश्चित करणे, हाच आहे. याकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला एक समिती नेमावी लागेल. नाहीतर कोणीच दखल घेणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. सीसीटीव्ही बसविण्याचे व बंद पडलेले सीसीटीव्ही दुरुस्त करण्याचे काम दोन कंत्राटदार करत आहेत, अशी माहिती कुंभकोणी यांनी दिली. सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रनुसार, राज्यात एकूण १,०८९ पोलीस ठाणी आहेत. आतापर्यंत ५४७ पोलीस ठाण्यात ६,०९२ सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यापैकी ५,६३९ सीसीटीव्ही सुरू आहेत. कंत्राटदारांना सर्व सीसीटीव्ही १५ दिवसांत दुरुस्त करण्यास सांगितले आहेत, असे कुंभकोणी यांनी सांगितले.

केवळ दोन कंत्राटदार का?हे काम करण्यासाठी केवळ दोनच कंत्राटदार का आहेत? दोनापेक्षा अधिक कंत्राटदार का नाहीत? असा सवाल न्यायालयाने सरकारला केला. या दोन कंत्राटदारांबरोबर नोव्हेंबर २०२० मध्ये कंत्राट केले होते आणि त्यापुढील पाच वर्षे ते देखभालीचे काम करणार होते. मात्र, कोरोनामुळे सीसीटीव्ही बसविण्यास विलंब झाला, असे कुंभकोणी यांनी म्हटले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २ मार्च रोजी ठेवली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेcctvसीसीटीव्ही