माळीणवासीयांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडे निधी नाही
By Admin | Updated: June 4, 2015 04:16 IST2015-06-04T04:16:38+5:302015-06-04T04:16:38+5:30
पावसाळ्यात डोंगर कोसळून उद्ध्वस्त झालेल्या माळीण गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी वेगवेगळ््या विभागाशी समन्वय साधून सर्व आराखडे तयार करण्यात

माळीणवासीयांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडे निधी नाही
सुषमा नेहरकर-शिंदे, पुणे
पावसाळ्यात डोंगर कोसळून उद्ध्वस्त झालेल्या माळीण गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी वेगवेगळ््या विभागाशी समन्वय साधून सर्व आराखडे तयार करण्यात आले आहेत. परंतु चार महिन्यांपासून वेळोवेळी स्मरणपत्र देऊनही शासन निधी देत नसल्याने जिल्हाधिकारी हतबल झाले आहेत.
गतवर्षी मुसळधार पावसाने डोंगराचा कडा कोसळून आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील ४४ घरे गाडली केली. यात तब्बल १५१ लोकांचा मृत्यू झाला. सध्या दुर्घटनाग्रस्त ७२ कुटुंबांचे अडिवरे आणि कशाळवाडी येथे तात्पुरते पत्र्यांच्या शेड टाकून पुनर्वसन करण्यात आले आहे. दोन किलामीटर अंतरावरील आमडे गावात
त्यांचे कायम पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आठ एकर जमिन संपादित करण्यात आली.
येथे प्रत्येक बांधित कुटुंबाला सुमारे ४९१ चौ.फुटचे घर देण्यात येईल. यासाठी सुमारे ६ कोटी १९ लाखांच्या कामांच्या टेंडरची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली. शासनाने त्वरित निधी द्यावा यासाठी जिल्हा प्रशासनाने ४ फेब्रुवारी आणि २७ एप्रिल रोजी पत्र दिले तर अखेर बुधवारी (३ जून) शासनाला तिसरे स्मरण पत्र देण्यात आले आहे.