राज्य सरकारने केला गाडगेबाबांचा अवमान
By Admin | Updated: May 30, 2015 01:18 IST2015-05-30T01:18:36+5:302015-05-30T01:18:36+5:30
माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या नावे सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचे नाव बदलून फडणवीस सरकारने गाडगेबाबांचा अवमानच केला आहे,
राज्य सरकारने केला गाडगेबाबांचा अवमान
मुंबई : माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा यांच्या नावे सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाचे नाव बदलून फडणवीस सरकारने गाडगेबाबांचा अवमानच केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
तटकरे म्हणाले, फडणवीस सरकारने संत गाडगेबाबांच्या नावाने सुरु केलेल्या अभियानाचे नाव बदलून स्वच्छ महाराष्ट्र अभियान असे केले आहे. त्यासाठी अभिनेता आमिर खानला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नेमले आहे. संत गाडगेबाबांनी महाराष्ट्राला स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यासाठी स्वत:च्या हाती झाडू घेतला. असे असताना त्यांचे नाव बदलून संताच्या कार्याचा अवमानच केला आहे, असा आरोप तटकरे यांनी केला.
अन्यथा २ जूनला आंदोलन
राज्य सरकारनं सांगितल्याप्रमाणे ३१ मेच्या रात्रीपासून काही टोल नाके बंद होणार आहेत. या टोलनाक्यांची यादी सरकारने दिलेली आहे. यातील एकही टोल जर बंद झाला नाही तर २ जूनला त्या टोलच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन करेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्य सरकारला दिला. (विशेष प्रतिनिधी)
च्शिवसेना ही सत्तेसाठी आसुसलेली आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. सरकारमध्ये राहूनही शिवसेना सरकारच्या विरोधी भूमिका घेते. जैतापूरबाबतही शिवसेनेला आपली स्पष्ट भूमिका घेता येत नाही.
च्एकीकडे त्यांचे मंत्री बोलतात आमचा जैतापूर प्रकल्पाला विरोध नसून स्थानिकांचा विरोध आहे नंतर सावरासावर करत शिवसेना नेते बोलतात आमचा प्रकल्पाला विरोध आहे, नेमकं शिवसेनेची भूमिका काय असून शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केला.