शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

राज्य सरकारचे 'मेक इन महाराष्ट्र'चे दावे फोल, रोजगार घटल्याचं चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 09:01 IST

‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ सारखे कार्यक्रम करुन गाजावाजा करणारं राज्य सरकार रोजगार आणि गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरल्याची माहिती RTI मधून समोर आली आहे.

ठळक मुद्दे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ सारखे कार्यक्रम करुन गाजावाजा करणारं राज्य सरकार रोजगार आणि गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरल्याची माहिती RTI मधून समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई - ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ सारखे कार्यक्रम करुन गाजावाजा करणारं राज्य सरकार रोजगार आणि गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरल्याची माहिती RTI मधून समोर आली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या सरकारचे दावे किती खरे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नोव्हेंबर 2016 पर्यंत राज्यात निरनिराळ्या उद्योग प्रकल्पात  11 कोटी 37 लाख 783 कोटींची गुंतवणूक होईल असं म्हंटल जात होतं, पण फक्त 2 कोटी 69 लाख 814 कोटींची गुतंवणूक झाली आहे.मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यातही गुंतवणूक कमी झाली आहे. विशेष म्हणजे रोजगार निर्मिती झालेली नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहेत. त्या मुंबईतही रोजगार निर्मिती आणि गुंतवणुकीत घट झालेली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाटगे यांनी केलेल्या अर्जाला हे उत्तर देण्यात आलं आहे.

नागपूर जिल्ह्यातील परिस्थितीजिल्ह्यातील कार्यरत इंडस्ट्री, फॅक्टरीवर्ष 2013-14 मध्ये  1332  इंडस्ट्री, फॅक्टरी कार्यरतवर्ष 2014-15 मध्ये  1267  इंडस्ट्री, फॅक्टरी कार्यरतवर्ष 2015- 16 मध्ये  12    इंडस्ट्री, फॅक्टरी कार्यरत

नागपूर जिल्ह्यातील रोजगार निर्मितीवर्ष 2013-14 मध्ये 8750वर्ष 2014-15 मध्ये 10,847वर्ष 2015-16 मध्ये 1151

एकूण गुंतवणूक (लाखांमध्ये)

वर्ष 2013-14 मध्ये  21196वर्ष 2014-15 मध्ये  14168वर्ष 2015-16 मध्ये   294

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थिती

रोजगार निर्मिती

वर्ष 2014 मध्ये 1156वर्ष 2015 मध्ये 3053वर्ष 2016 मध्ये 2513

चंद्रपूर जिल्ह्यातील गुंतवणूक (लाखांमध्ये)वर्ष 2014 मध्ये 3092वर्ष 2015 मध्ये 4019वर्ष 2016 मध्ये 2441

ठाणे जिल्ह्यातील परिस्थितीरोजगार निर्मिती

वर्ष 2014-15 मध्ये 65,071वर्ष 2015 (ऑक्टोबर 2015 पर्यंत) मध्ये 36,541

ठाणे जिल्ह्यातील गुंतवणूक (लाखांमध्ये)वर्ष 2014-15 1,33,034वर्ष 2015- (ऑक्टोबर 2015 पर्यंत) 1,02,323

मुंबई जिल्ह्यातील परिस्थितीकारखाने किंवा उद्योगांची नोंदणीवर्ष 2014-15 मध्ये 3685वर्ष 2015-16 मध्ये 1991

रोजगार निर्मितीवर्ष 2014-15 मध्ये 81,311वर्ष 2015-16 मध्ये  27,940

गुंतवणूक (लाखांमध्ये)वर्ष 2014-15 मध्ये 138385वर्ष 2015-16 मध्ये 121200

मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात रोजगार निर्मिती आणि गुंणवणुकीत मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. तर मुंबई, ठाणे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे.ज्या मेक इन इंडिया योजनेचा भव्य कार्यक्रम मुंबईत झाला तिथेच सरकार गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरलं असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.  तरी उद्योगमंत्र्यांनी मात्र मुंबई हे औद्योगिक शहर नाही आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंणवणूक आल्याचा दावा पुन्हा एकदा केला.

सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस ?मेक इन इंडिया सारख्या कार्यमक्रमात मुख्यमंत्र्यांनी आठ लाख करार केल्याचं जाहीर केलं होतं. पण मिळालेल्या माहितीनुसार, खरं चित्र वेगळंच आहे. सरकार फक्त घोषणा करतं आणि त्याची प्रसिद्धी करतं. प्रत्यक्षात काही होत नाही, हे यातून स्पष्ट होत असल्याची टीका होते आहे.राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असताना उद्योगासारख्या क्षेत्रात राज्याची झालेली पिछेहाट स्पष्ट होत आहे. ही माहिती नोटाबंदीच्या आधीच्या काळातील आहे. नोटाबंदीनंतर ही परिस्थिती अजून बिकट झाली असून शकते. पण त्याबद्दलची माहिती अजून समोर आलेली नाही. सरकारकडून विकासाच्या घोषणा होतात. पण त्याच्या अमंलबजावणीचं काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारBJPभाजपा