राज्य शासनाचा कापूस पणन महासंघाला मदतीचा हात!

By Admin | Updated: November 12, 2014 00:45 IST2014-11-11T23:43:07+5:302014-11-12T00:45:12+5:30

प्रभाव लोकमतचा; कापूस खरेदीसाठी दिले ३0 कोटींचे कर्ज.

State Government Cotton Help! | राज्य शासनाचा कापूस पणन महासंघाला मदतीचा हात!

राज्य शासनाचा कापूस पणन महासंघाला मदतीचा हात!

राजरत्न सिरसाट/अकोला
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड)ची पत उचल र्मयादा संपुष्टात आल्यामुळे, राज्यात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत हमी दराने कापूस खरेदी होण्यावर प्रश्नचिन्ह लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने मंगळवारी कापूस पणन महासंघास कापूस खरेदीसाठी ३0 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले.
राज्यात येत्या १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. तथापि, नाफेडची पत उचल र्मयादा संपली असल्याने, यावर्षी कापूस उत्पादक महासंघामार्फत हमी दराने कापूस खरेदी होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तोडगा म्हणून राज्य शानसाने मंगळवारी ३0 कोटी रुपयांचे कर्ज कापूस खरेदीसाठी मंजूर केले. नाफेडचा राज्यातील अभिकर्ता (एजंट) म्हणून काम करणार्‍या कापूस पणन महासंघाला ही रकम शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या कापसाची रक्कम अदा करण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. निधीअभावी ह्यनाफेडह्णने कापूस खरेदीबाबत हात वर केल्याचे वृत्त, लोकमतने ९ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन राज्य शासनाने हे कर्ज मंजूर केले आहे.

Web Title: State Government Cotton Help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.