शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने जारी केली व्हॉट्सअ‍ॅपसाठी आचारसंहिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 02:28 IST

या पार्श्वभीमीवर व्हाटस्अपवरील सर्व ग्रुप, त्यांचे निर्माते, अ‍ॅडमिन आणि सदस्यांसाठी आचारसंहिताच महाराष्ट्र सायबरने केली असून त्याचे पालन करण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या काळात चुकीचे मेसेज फिरत आहेत. विशेषत: व्हाट्सअ‍ॅपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज, पोस्ट्स पाठविल्या जात आहेत. कोरोनाला धार्मिक रंग देत समाजात अशांतता पसरेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

या पार्श्वभीमीवर व्हाटस्अपवरील सर्व ग्रुप, त्यांचे निर्माते, अ‍ॅडमिन आणि सदस्यांसाठी आचारसंहिताच महाराष्ट्र सायबरने केली असून त्याचे पालन करण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे सांगतानाच गृहमंत्री देशमुख म्हणाले की समाजमाध्यमाद्वारे कोरोना संदर्भात चुकीची माहिती, दहशत व भीती पसरविणाºया बातम्या समाजात पसरायला नकोत. कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरविलेल्या संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता सरकारने समाजमाध्यमांकरिता विशेष मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे त्याचे सर्वांनी पालन करावे, असे देशमुख म्हणाले.आपल्या ग्रुपमध्ये इतरांनी अशी पोस्ट केली असेल तर ती फॉरवर्ड करू नका, असे आवाहन ग्रुपच्या सदस्यांना करण्यात आले आहे. तर, अ‍ॅडमिनने खात्री करूनच एखाद्याला ग्रुपमध्ये घ्यावे, ग्रुपचा उद्देश, नियमावली सदस्यांना सांगावी. कोणी ग्रुपवर काही आक्षेपार्ह पोस्ट्स,मेसेजेस, व्हिडिओ , मीम्स किंवा तत्सम बाबी शेअर केल्यास, त्याला तात्काळ त्या ग्रुपमधून काढून टाकावे. गरज भासल्यास ग्रुप सेटिंग बदलून तो अ‍ॅडमिन ओन्ली करावा. सुचना देऊनसुद्धा आक्षेपार्ह पोस्ट्स टाकले जात असतील तर नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आक्षेपार्ह पोस्ट्स टाकणारे सदस्य आणि अ‍ॅडमिनला विविध कलमांखाली तीन वर्षापर्यंतचा कारावास, द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर, भारताच्या सार्वभौमत्वाला व स्वायत्तत्तेला धोका निर्माण करण्यास कारणीभूत ठरणारी विधाने असतील तर यासंदर्भातील कलमानुसार आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे. तसेच अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.‘आक्षेपार्ह मोबाइलमध्ये ठेवू नका’धर्म, समुदायाविरुद्ध हिंसक, अश्लील, भडकावू व तेढ निर्माण होईल असे साहित्य, पोस्ट्स, व्हिडीओ, मीम्स कोणत्याही ग्रुपवर किंवा वैयक्तिकपणेसुद्धा शेअर करू नये, मोबाइलमध्ये पण स्टोअर करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखcorona virusकोरोना वायरस बातम्याWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप