शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य गारठले; निफाडमध्ये हिमकण; धुळे २.२ अंशांवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 06:31 IST

थंडीची लाट आल्याने महाराष्ट्र गारठला आहे. लातूर जिल्ह्यात थंडीने एकाचा बळी घेतला तर महाबळेश्वरसह नाशिकमधील निफाड परिसरात हिमकण आढळून आले. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज आहे.

मुंबई/ पुणे : थंडीची लाट आल्याने महाराष्ट्र गारठला आहे. लातूर जिल्ह्यात थंडीने एकाचा बळी घेतला तर महाबळेश्वरसह नाशिकमधील निफाड परिसरात हिमकण आढळून आले. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज आहे.नागपूरमध्ये ८१ वर्षांचा विक्रम मोडीत ३.५ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली, तर धुळ्यात २.२ इतक्या तापमानाची नोंद झाली. विदर्भात जीवघेणा गारठा आहे. लातूर, परभणी, नाशिक येथेही विक्रमी नीचांकी तापमान नोंदले गेले. उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू-काश्मीर तसेच राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्येही तापमान शून्याखाली गेले आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाºयांमुळे महाराष्ट्र गारठला आहे.एकाचा गारठून बळीलातूरच्या तेरणा खोºयातही कमालीचा गारठा असून, लातूरमधील तापमान ४ अंशांवर आले. सावरी (ता़ निलंगा) येथील व्यंकट बाजीराव जाधव या ६२ वर्षीय शेतकºयाचा गारठून मृत्यू झाला. थंडीचा कडाका पिकांना बाधला असून, दव पडल्याने पिकांची फुलगळ झाली आहे़ पिकांची वाढ खुंटली आहे़ द्राक्ष बागांच्या मण्याला तडे जाऊन वाढ खुंटली आहे़कोलकास व्हॅलीत बोचरी थंडीमेळघाटातील कोलकास-सेमाडोह व्हॅलीत बोचºया थंडीने कहर केला आहे. चिखलदरा व कुकरूत रात्रीचे तापमान ४ डिग्री सेल्सिअसवर आले असून दवबिंदू गोठू लागले आहेत. आलाडोह-मोथ्याकडे जाणाºया रस्त्यावरील खोलगट भागातून वाहणाºया ब्रह्मसती नदीलगतच्या भागात दवबिंदू गोठत आहेत.महाबळेश्वरात दुसºया दिवशीही हिमकणमहाराष्ट्राचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाºया महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. तिथे सलग दुसºया दिवशी दवबिंदू गोठले. वेण्णा तलाव ते लिंगमळा परिसरात सुमारे दोन अंश सेल्सिअस एवढे नीचांकी तापमान होते.नाशिकमध्येही कहरनाशिकमध्ये हंगामातील सर्वाधिक नीचांकी ५.१ इतके किमान तपमान नोंदविले गेले, तर निफाड तालुक्यात ३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली घसरला. निफाड परिसरात अनेक ठिकाणीदवबिंदू गोठले होते. खान्देशातही थंडीचा कडाका कायम आहे. कडाक्याच्या थडीने द्राक्ष तसेच केळी बागायतदारांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रweatherहवामान