गोव्यात उद्यापासून राज्य चित्रपट महोत्सव
By Admin | Updated: August 4, 2016 19:44 IST2016-08-04T19:44:48+5:302016-08-04T19:44:48+5:30
माहिती आणि प्रसिद्धी संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित आठव्या राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन उद्या होईल

गोव्यात उद्यापासून राज्य चित्रपट महोत्सव
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ४ : माहिती आणि प्रसिद्धी संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित आठव्या राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन उद्या (दि. 5) सायंकाळी 5.30 वाजता कला अकादमीत उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते होईल. नाचुया कुंपासार चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडला जाईल.
उद्घाटन सोहळ्यास गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक तसेच माहिती आणि प्रसिद्धी सचिव दौलत हवालदार उपस्थित असतील. महोत्सवात 12 चित्रपटांचे खेळ होतील. यात नऊ कोकणी चित्रपट, दोन मराठी आणि एका लघुपटाचा समावेश आहे. निर्मोण, रोज तुं, एनिमी, होम स्वीट होम, होम स्वीट होम 2, एमएमएस, हाव तूं तूं हाव, हे कोकणी चित्रपट आहेत. तसेच गुरुपौर्णिमा आणि प्रेम अॅट फस्र्ट साईट हे मराठी चित्रपट तर द गेस्ट हा लघुपट पाहता येईल.
दरम्यान, दि. 7 रोजी समारोप सोहळ्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अभिनेता नाना पाटेकर, अभिनेता सचिन पिळगावकर, अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि मृणाल कुलकर्णी यांची उपस्थिती लाभेल. समारोप सोहळ्यात गायिका बेला शेंडे यांचे खास गायन होईल. त्याचबरोबर एन. चंद्रा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. कोकणी चित्रपट विभागात 21 पुरस्कार, मराठी चित्रपट विभागात 21 पुरस्कार आणि लघुपटासाठी 7 पुरस्कार दिले जाणार आहेत